नाशिक बाजार समिती सचिव घोलप निलंबित; सभेच्या इतिवृत्तामध्ये फेरफार केल्याचा ठपका.

संचालक मंडळ सभेच्या इतिवृत्तात नाशिक बाजार समितीचे विभाजन करण्याबाबत सभेवर नसलेल्या विषयाचा ठराव स्वतंत्र कागदान्वये चिटकविला आहे.नाशिक बाजार समितीमध्ये सचिव प्रकाश घोलप यांनी कामकाज करीत असताना अनेक गैरप्रकार केले आहेत. संचालक मंडळ सभेच्या इतिवृत्तात नाशिक बाजार समितीचे विभाजन करण्याबाबत सभेवर नसलेल्या विषयाचा ठराव स्वतंत्र कागदान्वये चिटकविला आहे.समितीच्या सभेतील इतिवृत्तात फेरफार केल्याचा ठपका ठेवत संचालक मंडळाने घोलप यांना निलंबित केले असल्याची माहिती सभापती कल्पना चुंभळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. घोलप यांनी कार्यालयीन जावक क्र ९० हा दि. २ मे २०२४ या जुन्या तारखेस जावक रजिस्टरला नोंदवून सदर प्रस्ताव पणन संचालक, महाराष्ट्र यांना प्रत्यक्षात दि. १० मार्च २०२५ रोजी प्राप्त झाल्याचे त्यांच्याकडील पत्रावरून समजले. पत्रावर जा. क्र. पणन-५/नाशिक कृउबास विभाजन/२०२५/१०७६ दि.२५ मार्च २०२५ अन्वये आढळून आले आहे.

अशा प्रकारे महत्त्वाच्या व कायम दस्तऐवजमध्ये फेरफार करून गंभीर गैरकृत्य घोलप यांनी केल्याचा आरोप संचालकांनी केला.यावेळी विजय माळेकर, सविता तुंगार, चंद्रकांत निकम, प्रल्हाद काकड उपस्थित होते. कृषी उत्पन्न खरेदी-विक्री नियमन तुरतुदीनुसार सचिवांना त्वरित निलंबीत केले आहे. सचिवपदाचा पदभार सहाय्यक सचिव निवृत्ती बागूल यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

तत्कालीन सभापती यांच्या कार्यकाळातील तीस वर्षांचा कारभार स्वच्छ करण्यास सुरुवात झाली आहे. अशा प्रकारचे आणखी गंभीर प्रकार समितीत असू शकतात. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. नाशिक, त्र्यंबक, पेठ तालुक्याची बाजार समितीचे विभाजन हा विषय अजेंड्यावरील नसून, तो ऐन वेळचा विषय होता. तत्कालीन सभापतींनी संचालक मंडळ यांच्याशी चर्चा करून त्याविषयी प्रोसिडिंग करायला सांगितली. त्यानुसार आपण नोंद घेतली आहे. याबाबत कोणत्याही प्रकारची अफरातफर झाली नाही.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.