चीनने आपली ४ हजार किमी जमीन बळकावली; राहुल गांधींचा लोकसभेत आरोप.

चीनने आपली ४ हजार किलोमीटर जमीन बळकावली आहे, या मुद्द्यांवर सरकार काय करत आहे? याचे उत्तर मिळाले पाहिजे, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत गुरुवारी केला.‘आज आपले भागीदार देश २६ टक्के शुल्क लादत आहेत व चीनने आपली ४ हजार किलोमीटर जमीन बळकावली आहे, या मुद्द्यांवर सरकार काय करत आहे? याचे उत्तर मिळाले पाहिजे,’ असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत गुरुवारी केला. दुसरीकडे, ‘लोकसभेत मनमानीपणे मंजूर केलेले वक्फ विधेयक हा राज्यघटनेवरील हल्ला आहे,’ अशा शब्दांत काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी संताप व्यक्त केला.‘दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना एकदा कोणीतरी परराष्ट्र व्यवहार धोरणाबाबत विचारले तेव्हा इंदिरा गांधी उत्तरल्या की, मी डावीकडे किंवा उजवीकडे जाणार नाही.

मी भारतीय आहे आणि मी सरळ आणि ताठ उभी राहीन,’ हा किस्सा सांगताना ‘चीनने व्यापलेली जमीन भारताने परत घ्यावी’, अशी मागणी राहुल गांधी यांनी शून्य प्रहरात केली. ‘चीनने भारताच्या जमिनीवर कब्जा केला आहे. परंतु भारताचे परराष्ट्र सचिव चिनी राजदूतासोबत केक कापत आहेत याचे मला आश्चर्य वाटते. परिस्थिती सामान्य होण्यापूर्वी, आम्हाला आमची जमीन परत मिळाली पाहिजे,’ असेही गांधी म्हणाले.दरम्यान, लोकसभेत काल मंजूर केलेले वक्फ मंडळ दुरुस्ती विधेयक हा राज्यघटनेवरचा थेट हल्ला असून हे जबरदस्तीने मंजूर केलेले विधेयक आहे, असा आरोप सोनिया गांधी यांनी केला.

वक्फ दुरुस्ती विधेयक आज (गुरुवारी) राज्यसभेत मांडले जाणार आहे. हे विधेयक हा आपल्या समाजाला कायमचे तोडण्याच्या भाजपच्या सुनियोजित रणनीतीचा एक भाग आहे, असा आरोप त्यांनी केला.’एक राष्ट्र, एक निवडणूक’ निवडणूक आयोगाचे कामकाज, शेजारील देशांची राजकीय परिस्थिती, संसदेतील अडथळे, विरोधी नेत्यांना “बोलण्याची परवानगी नसणे” आदी मुद्द्यांवर सोनिया यांनी सरकार आणि पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.