विधानसभेला चिडून पक्ष सोडला, आता हसत घरवापसी; बड्या नेत्याचा पुन्हा शिवसेना प्रवेश.

विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन शिंदे गटातून बाहेर पडलेले विजय नाहटा पुन्हा एकदा शिवसेनेच्या शिंदे गटात सामील झाले आहेत.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाकडून विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन शिंदे गटातून बाहेर पडलेले विजय नाहटा पुन्हा एकदा शिवसेनेच्या शिंदे गटात सामील झाले आहेत.नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी पुढाकार घेतल्याने नाहाटा यांची घरवापसी झाली असल्याची चर्चा आहे. नाहटा यांनी अपक्ष म्हणून अलीकडेच निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.यांनी विजय नाहटा यांना जोमाने पक्षाचे काम करण्याचे निर्देश दिले आहेत.

शिवाय त्यांच्यावर असलेली शिवसेना उपनेतेपदाची जबाबदारी पुन्हा त्यांच्याकडे देण्यात आली आहे. शिंदे यांनी नाहटा यांना येत्या पालिका निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.दरम्यान, जनसेवेसाठी आणि पक्षासाठी तसेच संघटना वाढवण्यासाठी जो काम करेल तोच शिवसेनेत मोठा आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी येथील ठाणे येथील गावदेवी मैदानाच्या उद्घाटन प्रसंगी केले.शिवसेनेचे माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या प्रयत्नातून व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने अंबरनाथ पूर्व भागात शिवाजी नगर पोलिस स्टेशन समोरील गावदेवी मैदानात व्यायामशाळा, बालोद्यान आणि जिजामाता व बाल शिवाजी यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. त्याचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.

‘अंबरनाथ शहर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवडीचे शहर आहे. त्यामुळेच एखाद्या महापालिका क्षेत्रात जेवढी कामे होत नाहीत त्याहुन अधिक प्रकल्प अंबरनाथमध्ये उभे राहत आहेत. येत्या काळात शिवमंदिर कॉरिडोर, क्रीडा संकुल, नाट्यगृह, न्यायालय व वैद्यकीय महाविद्यालय यासह महत्त्वाचे प्रकल्प सेवेत येतील, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख, युवा सेनेचे निखिल चौधरी आदी उपस्थित होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.