पोहायचं ठरलं, स्विमिंग पूलमध्ये उतरले ६ आणि माघारी आले ५, काही मिनिटांत पळापळ आरडाओरड… होत्याचं नव्हतं घडलं.

शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथील १८ वर्षीय युवकाचा नंदुरबार येथील स्व. बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावात पोहताना मृत्यू झाला. तरुणांच्या पोहण्याच्या आनंदात ललित पाटील खोल पाण्यात बुडाला आणि नातेवाईकांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.तालुक्यातील बाम्हणे येथील सहा मित्र नंदुरबार येथील नगरपालिकेच्या स्व. बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावात पोहण्यासाठी रेल्वेने आले.पोहताना खोल पाण्यात गेल्याने १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना 3 मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली. पाटील कुटुंबातील ललित हा एकुलता एक मुलगा होता. जलतरण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी करत संबंधांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. रात्री मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले नव्हते.
शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथील ललित सुधीर पाटील (वय १८), हरीश दगडू निकम (वय २१), निलेश सुनील पाटील (वय १७), हर्षल संजय पाटील (वय १७), दुर्गेश प्रवीण पाटील (वय १७) व हितेश अधिकार पाटील (वय १७) हे सहा तरुण नंदुरबार शहरातील स्व. बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावात पोहण्यासाठी दुपारी २ वाजेच्या रेल्वेने नंदुरबारला आले. त्या तरुणांनी शहरातील बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावात येथे येऊन पोहण्याचा आनंद घेतला.

सर्व तरुण पाच फूट खोल पाण्यात पोहण्याचा आनंद घेत असताना ललित सुधीर पाटील हा आठ फूट पाण्यात गेला. या ठिकाणी पोहत असताना तो पाण्यात बुडत असल्याचे त्याच्या मित्रांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी आरडाओरड केल्याने सुरक्षा गार्डने ललित यास बाहेर काढले. मात्र, तो बेशुद्ध झाला. त्यामुळे मित्रांनी त्याला रिक्षातून तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉ.मंगला तुंगार यांनी तपासणी करून ३.४५ वाजता ललित यास मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ, एपीआय वानखेडे, पीएसआय स्वप्नील पाटील यांनी घटनास्थळी व जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. याबाबत हरीश निकम याने दिलेल्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पीएसआय स्वप्नील पाटील करीतसिंदखेड तालुक्यातील बाम्हणे येथील सुधीर पाटील यांच्या कुटुंबातील ललित हाएकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात एक बहीण आहे. ललितच्या मृत्यूनंतर मित्रांनी घटनेची माहिती बाम्हणे येथील नातलग व गावकऱ्यांना दिली. माहिती मिळताच ललितचे काका, काकू इतर नातलग व गावकरी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. यावेळी काका व काकूने जिल्हा रुग्णालयात आक्रोश केला.सायंकाळी उशिरापर्यंत ललित याच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले नव्हते. नातलग व गावकऱ्यांनी जलतरण प्रशासनाने दुर्लक्ष केले. गार्ड होते मग ललित पाण्यात बुडालाच कसा? आदी प्रश्न उपस्थित करीत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. योग्य त्या पद्धतीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पीआय मनेळ यांनी दिले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.