गारपीट व अवकाळी पाऊसाने शेतीच्या पिकाचे नुकसान झालेल्या पारोळा तालुक्यातील करमाड व परिसराची पाहणी .

पारोळा तालुक्यासह एरंडोल विधानसभा मतदारसंघातील अन्य भागांत काल दिनांक २ एप्रिल रोजी गारपीट व अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतातील मक्का, ज्वारी, बाजरी, भुईमुंग, भाजीपाला पिके, फळबागा यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पिकांवर लावणीपासून तर आज उभी असलेल्या पिकांवर शेतकऱ्यांनी काबाळ कष्ट करून, कसाबसा पैसा उभा करून शेती केली होती. सद्यस्थितीत शेतातून हि पिके काढून त्यांची विक्री करून आपला दैनंदिन उदरनिर्वाह हा बळीराजा भागवणार होता.

परंतु या गारपिटीसह अवकाळी पावसाने या बळीराजाच्या शेतात उभी असलेली पिके जमीनदोस्त केली. यामुळे शेतकरी हा मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे.सदर नुकसान झालेल्या पारोळा तालुक्यातील करमाडसह परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन गारपिट व अवकाळी पाऊसाने झालेल्या नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली व तात्काळ सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याकरिता लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्यासंदर्भात प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. सदर नुकसान झालेल्या परिस्थितीची पाहणी करून. सदर आढावा आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे सादर करणार असून, शेतकऱ्यांना सदर नुकसानीचा संपूर्ण मोबदला मिळण्याचे संदर्भात प्रयत्न करणार असल्याचे यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना ठोस आश्वासित केले.प्रसंगी देवगांव सरपंच समिर पाटील, तहसिलदार अनिल पाटील, करमाड सरपंच शरद पवार, गोपाल,पाटील, मुंदाणे सरपंच एकनाथ पाटील, आडगांव सरपंच महेश मोरे यांचेसह शेतकरी उपस्थित होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.