वक्फ विधेयकावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली असताना मंत्री बावनकुळे यांनी जोरदार पलटवार केला आहे.उद्धव ठाकरे यांनी वक्फ विधेयकावर आज पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली. राजकीय पोळ्या भाजायचं विकृत राजकारण भाजप करत आहे. भाजपचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचे म्हणाले. तसेच अमेरिका, चीन या मुद्द्यावरही सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली होती. त्यावर मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी जोरदार पलटवार केला आहे. भूमिका घेता येत नाही आणि लांगूलचालनही सोडता येत नाही अशी अवस्था तुमची झाली आहे. तसेच या पोस्टमध्ये त्यांनी संजय राऊत यांचा उद्देश साध्य झाला असल्याचेही म्हटले आहे. ‘संजयराऊतप्रोटिझम’ असा उल्लेख यात केला आहे.










