पुलाच्या कठड्याला बाईक आदळून घात झाला, कोथरुडमध्ये विशीतील दोघा मित्रांचा करुण अंत.

 पुलाच्या कठड्यास धडकल्याने दुचाकीस्वारासह सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना पुण्यातील गजबजलेल्या कोथरुड भागातील पौड फाट्याजवळ पुलावर घडली.पुलाच्या कठड्यास धडकून दोघा दुचाकीस्वार तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुण्यात घडल्याचे समोर आले आहे. ही घटना कोथरुड येथील पौड फाट्याजवळ पुलावर घडली. या अपघातात ऐन विशीतील दोघा युवकांना प्राण गमवावे लागले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.पुलाच्या कठड्यास धडकल्याने दुचाकीस्वारासह सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना पुण्यातील गजबजलेल्या कोथरुड भागातील पौड फाट्याजवळ पुलावर घडली.सर्वेश गोपाळ पाटील (वय २० वर्ष) आणि पुष्कर सुधाकर चौधरी (वय १९ वर्ष, रा. तुरक गुप्हाडा, जि. बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत.

दुचाकीस्वार सर्वेश हा त्याचा मित्र पुष्कर याच्यासमवेत पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पौड फाटा परिसरातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पुलावरून निघाला होता. यावेळी भरधाव दुचाकी पुलाच्या कठड्याला जोरात धडकल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत अधिक तपास कोथरूड पोलीस करत आहेत.याआधी, अपघातात जखमी झालेल्या श्रमिकाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याऐवजी पुलावरून खाली फेकल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. यात श्रमिकाचा मृत्यू झाला. कृष्णा बुलसे असे मृताचे नाव आहे.कृष्णा व रूपेश गुमगाव येथे बांधकामाचे काम संपवून सोमवारी संध्याकाळी मोटारसायकलने घरी परत जायला निघाले होते. मोटारसायकल रूपेश चालवत होता. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटसमोर एका कारने त्यांच्या बाईकला समोरुन कट मारला. यामध्ये रुपेशचे बाईकवरील नियंत्रण सुटले आणि त्यामुळे कृष्णा उसळून खाली पडले.यावेळी मागून आलेल्या कारने कृष्णा यांना धडक दिली. चालकाने त्यांना उपचारासाठी नेत असल्याचे रुपेशला सांगितले. जखमी कृष्णा यांना चालकाने कारमध्ये बसवलं. त्यांच्या मागून रुपेश बाईकने जात होता. मात्र चालकाने संधी साधून कृष्णा यांना चिचभुवन पुलावरुन खाली फेकले आणि गाडीसह पसार झाला. दुर्दैवाने उपचाराअभावी तडफडून कृष्णा यांचा मृत्यू झाला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.