कारची धडक, उपचाराच्या बहाण्याने जखमी अवस्थेत गाडीत बसवलं अन् पुलावरुन खाली फेकलं, तरुणाच्या मृत्यूने नागपूर हादरलं.

मागून आलेल्या कारने त्यांना धडक दिली. चालकाने कृष्णा यांना उपचारासाठी नेत असल्याचे रूपेश यांना सांगितले. जखमी कृष्णा यांना चालकाने कारमध्ये बसविले.अपघातात जखमी  झालेल्या श्रमिकाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याऐवजी पुलावरून खाली फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यात श्रमिकाचा मृत्यू झाला. या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. कृष्णा बुलसे (वय ४५, रा. अयोध्यानगर) असे मृताचे नाव आहे. नागपुरातील  बेलतरोडी परिसरात हा प्रकार घडला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा व रूपेश गुमगाव येथे बांधकाम करतात. सोमवारी सायंकाळी काम संपवून दोघेही मोटारसायकलने घरी परत जायला निघाले. मोटारसायकल रूपेश चालवीत होता. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटसमोर एका कारने मोटारसायकलला कट मारला. रूपेश यांचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले. उसळून कृष्णा खाली पडले.याचदरम्यान मागून आलेल्या दिली.

चालकाने कृष्णा यांना उपचारासाठी नेत असल्याचे रूपेश यांना सांगितले. जखमी कृष्णा यांना चालकाने कारमध्ये बसविले. त्यांच्या मागे रूपेश मोटारसायकलने जात होता. याचदरम्यान चालकाने संधी साधून कृष्णा यांना चिचभुवन पुलावरून खाली फेकले व कारसह पसार झाला. उपचाराअभावी तडफडून कृष्णा यांचा मृत्यू झाला.दरम्यान, कारचालक अचानक बेपत्ता झाल्याने रूपेश घाबरले. त्यांनी एम्स, मेडिकल कॉलेज व मेयो हॉस्पिटलमध्ये तब्बल आठ तासांपर्यंत कृष्णा यांचा शोध घेतला. मात्र, ते आढळून आले नाहीत. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी कृष्णा यांचा शोध सुरू केला. पहाटे अडीचच्या सुमारास कृष्णा पुलाखाली मृतावस्थेत आढळले.दुसरीकडे, उंड्री परिसरात मॉर्निंग वॉक करणाऱ्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चालकाला बुधवारी काळेपडळ पोलिसांनी अटक केली.

अपघातानंतर या चालकाने दोन्ही बाजूची नंबरप्लेट काढून मोटार औताडेवाडी येथे निर्जन ठिकाणी लपवून ठेवली होती. पोलिसांनी ‘सीसीटीव्ही’ व तांत्रिक विश्लेषणाद्वारे मोटारीचा नंबर शोधून अवघ्या दहा तासांच्या आत चालकाला बेड्या ठोकल्या.समीर गणेश कड (रा. कडनगर, होलेवस्ती चौक, उंड्री) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात काळेपडळ पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ (सदोष मनुष्यवध), कलम १०६ (हयगयीने मृत्यूस कारणीभूत होणे), कलम २८१ (सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालविणे) यासह मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या अपघातात सुजितकुमार बसंतप्रसाद सिंग (वय ४९, रा. हांडेवाडी रोड, उंड्री) यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी साडेसहा ते आठच्या दरम्यान उंड्री येथील न्याती एबनी सोसायटीसमोर घडली होती.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.