पुढील २४ तास महत्वाचे, हवामान खात्याकडून थेट इशारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस.

संपूर्ण महाराष्ट्रात हवामानात बदल होताना दिसत आहे. अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. वादळी वारा आणि गारपिटमुळे काही ठिकाणी मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासांमध्ये विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसतोय. ढगाळ वातावरण संपूर्ण राज्यात बघायला मिळतंय. अवकाळी आणि गारपिटचे ढग राज्यावर आहेत. पावसाला पोषक वातावरण आहे. लातूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसलाय. आज हवामान खात्याकडून मोठा इशारा देण्यात आलाय. पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मुळात म्हणजे होळीनंतर उष्णतेत मोठी वाढ होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्षात होळीनंतर वातावरण पूर्ण बदलल्याचे बघायला मिळतंय.

काल राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस झाला. आजही तिच परिस्थिती असणार आहे. काही ठिकाणी पाऊस, वादळी वारा आणि गारपिट होणार आहे. मुळात म्हणजे हवामान खात्याकडून संपूर्ण राज्यासाठी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय. येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणामध्येही कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. सांगली, सातारा, खटावमध्येही पावसाची नोंद झालीये.दुसरीकडे ब्रह्यपुरीत तापमान वाढताना दिसतंय. काल बह्यपुरीत तापमान ४०.२ पर्यंत पोहोचले होते. यवतमाळ, सोलापूर, चंद्रपूर, परभणी, धुळे, धाराशिव, निफाडमध्ये पारा वाढताना दिसतोय. अकोला आणि अमरावतीमध्येही आज अवकाळी पावसासोबतच गारपीटचा ऑरेंज इशारा देण्यात आलाय.

मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा देण्यात आला आहे. ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी उकाडा वाढल्याचे चित्र बघायला मिळत आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील २४ तासांत नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये गारपीट, सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. गारपिटचे मोठे संकट सध्या राज्यासमोर असल्याचे बघायला मिळतंय. पुढील दोन दिवस अवकाळीचे ढग कायम असल्याचेही बोलले जातंय. गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांवर मोठे संकट आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.