रुग्णालयाबाहेरही आप्तांची परवड, फोन चार्जसाठी १० ते २० रुपयांचा दर, तातडीच्या गरजेमुळे दुकानदारांचे फावले.

रुग्णालयात चार्जिंगची सुविधा नसल्याने रुग्णालयाबाहेर दुकानदारांकडून १० ते २० रुपये घेतले जातात. अशात रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची रुग्णालयाबाहेरही मोठी परवड होते.मुंबईतूनच नव्हे तर राज्याच्या कानाकोपरांतून हजारो रुग्ण वैद्यकीय उपचारासाठी मुंबईच्या सार्वजनिक रुग्णालयांमध्ये येतात. यातील अनेक रुग्ण आर्थिक परिस्थितीने खंगलेले असतात. संपर्कासाठी फोन असला तरी, घाईगडबडीत कधी कधी चार्जर आणलेला नसतो. अशा परिस्थितीत काही रुग्णालयांत चार्जिंगची सुविधा नसल्याचा फायदा घेत रुग्णालय परिसरातील दुकानदार फोन चार्ज करण्यासाठी चक्क १० ते २० रुपये आकारत आहेत. रुग्णाच्या चिंतेत असणाऱ्या नातेवाइकांना असे नडले जात असताना रुग्णालय प्रशासनच चार्जिगची सुविधा का पुरवत नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.धुळे येथून १२ वर्षाच्या मुलाला घेऊन परळच्या रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या अश्विनी पवार यांच्याकडे वैद्यकीय उपचारांसाठी मोठी रक्कम नव्हती.

योजनेंतर्गत उपचार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. काही कागदपत्रे घरी राहिली होती. येताना घाईगडबडीमध्ये फोनचे चार्जर आणायचे राहिले. अखेर परळ येवोल दुकानामध्ये फोन चार्ज करून त्यांनी घरी संपर्क केला, अर्ध्या तासासाठी २० रुपये दर होता. १५ मिनिटांत चार्जिग झाले, परंतु पैसे मात्र अर्ध्या तासाचे द्यावे लागले, असे त्यांनी सांगितले.परळ परिसरामध्ये महापालिका आणि खासगी अशी दोन्ही प्रकारची रुग्णालये मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे या परिसरात रुग्णांचा ओढा अधिक असतो.

संपर्कासाठी, अडअडचणीच्या वेळी मोबाईल चार्ज असायला हवा, यासाठी रुग्णांचे कुटुंबीय पैसे मोजून चार्जिंगची सुविधा घेतात. कामा रुग्णालयामध्ये आठ महिन्यांपूर्वी रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी दात्यांच्या माध्यमातून रुग्णालयामध्ये मोबाईल चार्जिंगची विशेष सुविधा तयार करण्यात आल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले, तर, विलेपार्ले पश्चिम येथील पालिकेच्या कूपर रुग्णालयामध्येही अशी विशेष सुविधा नाही, मात्र ती करण्यासंदर्भात विचार करू, असे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते म्हणाले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.