उत्राण ता. एरंडोल जिल्हा जळगाव मध्ये महसूल विभागातील भ्रष्ट अधिकारी यांचे आशीर्वादाने चालणारी अवैध वाळू व्यवसाय करणारे वाळू माफिया यांची तक्रार.
दीपककुमार पी. गुप्ता, वय ४८, सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता, रा. ३८८, घरकुल, शिवाजीनगर, ता. जि. जळगाव. मला ग्रामपंचायत उत्राण ता. एरंडोल जिल्हा जळगाव येथील सरपंच यांनी मला उत्राण येथे होत असलेल्या अवैध वाळू व्यवसाय करणारे वाळू माफिया विरुद्ध तक्रार दिलेली आहे व सोबत विडीओ रील्स माझे व्हाटसप नंबर वर पाठवली आहे. तसेच त्या तक्रार मध्ये त्यांनी म्हटले आहे की, “आमच्या गावात दिवस-रात्र वाळूची चोरी सुरु आहे. निलेश भिला कोळी हा वाळू माफिया ग्रा.प. कार्यालय व तलाठी कार्यालय प्रांगणात डेपो लावून JCB द्वारे डम्पर भरणा करतो व गावात असे दाखवतो कि मला गावात कोणीही रोकु शकत नाही व मी सर्व अधिकारीना विकत घेतलेले आहे म्हणून माझे कोणीही वाकड करू शकत नाही या कृत्यावरून आमचे असे लक्षात येते कि तलाठी, मंडळ अधिकारी, कासोदा पोलीस स्टेशन, तहसीलदार व प्रांताधिकारी या अधिकारी सोबत चीरी-मीरी करून गावात दहक्षत निर्माण करून ठेवली आहे. तरी सुध्दा वरील अधिकारी संगममताने हे सर्व चालू आहे त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे स्वताःला गुंठ वाळू माफिया म्हणून दाखवत आहे तरी आपण हि गोष्ट वरिष्ठ अधिकारी किवा पद अधिकारी कडे पोचवावे आम्ही ग्रा.प. सरपंच उपसरपंच व सदस्य व सर्व ग्रामस्थ मध्ये भीतीची वातावरण आहे तरी आमची तक्रार हि गुपित ठेऊन संबधित व्यक्तीवर योग्य ती कारवाही करावी हि तक्रार आम्ही केली आहे असे त्याला माहित पडल्यास आमच्या जीवाला धोका निर्माण होईल याची दक्षता घ्यावी व या गुंठचा बंदोबस्त करावा जेणे करून आमच्या गावात वाळू चोरी बंद होईल तसेच सोबत त्याचे व्हिडीओ तसेच सी सी टीव्ही फुटेज तुम्हाला मेल द्वारे पाठवतो” अशी तक्रार मला दिनांक १९/०८/२०२४ रोजी प्राप्त झाली आहे.
याबाबत माझे सूत्राकडे अधिक चौकशी केली असताना मला काही लोकानी नाव न सांगण्याचे अटीवर अशी माहिती दिली आहे की, १० चाकी डम्पर / वाहन अवैध वाळू वाहतूक करणे देणेसाठी तहसीलदार एरोंडल श्रीमती सूचित्रा चव्हाण मॅडम यांचा ३० हजार रुपये प्रती वाहनाचा हप्ता घेत आहे. तसेच प्रांत अधिकारी एरोंडल यांचा ३० हजार रुपये, संबंधित मंडल अधिकारी यांचा ५ हजार रुपये व एरोंडल पोलिस स्टेशन यांचा १५ हजार रुपये प्रती वाहनाचा हप्ता घेत आहे. अस वरनमूद भ्रष्ट अधिकारी यांचे जोरावर अवैध वाळू वाहतूक फोफावली आहे. याकारणाने शासनाची कधी न भरून येणारी महसूलची हानी होत आहे. तसेच या सोबत पर्यावरणची देखील हानी होत आहे. वरनमूद भ्रष्ट अधिकारी यांचे जोरावर बाळू माफिया हे महसूल व पोलिस प्रशासनाला सोशल मिडिया (Instagram id @9696_9696_KOLI) आव्हान देत आहे.
सदरची तक्रार मला जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे कारवाई करतील याचा मला त्यांचेवर विश्वास नसल्याने ही तक्रार आपल्याकडे कारवाईचे आशेने करत आहे.
तरी प्रवीण गेडाम साहेब आपल्याला माझी नम्र विनंती आहे की, १. आपले विभागातील वरील संबंधित अधिकारी / कर्मचारी यांची विभागीय चौकशी करून दोषी आढळल्यास शासन सेवेतून बडतर्फ करणे व त्यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करावे. अशी मागणी करण्यात येत आहे.