पुणे : दुकानासमोर गाड्या लावल्या म्हणून त्या ढकलून दिल्याने वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यावरील गाड्या काढून घेणार्या दोघा वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करुन मारहाण करुन जखमी करणार्या दुकानदाराला पोलिसांनी अटक केली आहे. गणेश लक्ष्मण कदम (वय ४०, रा. उंड्री पोलीस चौकीच्या मागे, उंड्री) असे त्याचे नाव आहे.
याबाबत पोलीस अंमलदार उमेश राजू दाभेकर यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार उंड्री चौकात पावणेसहा वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश दाभेकर हे अशोक म्हस्के यांच्यासह उंड्री चौकात वाहतूक नियमन करत होते. पावणेसहा वाजता एका रिक्षावाल्याने त्यांना येऊन सांगितले
की शंकर मंदिर येथे एक जण येणार्या जाणार्या लोकांना शिवीगाळ करुन रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दुचाकी रस्त्यावर ढकलून वाहतूकीस अडथळा निर्माण करीत आहे, असे सांगितले. त्यामुळे ते अशोक म्हस्के यांना घेऊन शंकर मंदिराजवळ केले. तेथे एक जण मोठमोठ्याने आरडाओरडा व शिवीगाळ करत शंकर मंदिरासमोर लावलेल्या दुचाकी गाड्या रस्त्यावर ढकलून लाथा मारत होता. त्यामुळे उंड्री चौकात मोठ्या प्रमाणावर व…









