पाचोऱ्यात साडेबावीस लाखाचा गुटखा जप्त ; दोघांना अटक.

 राज्यात बंदी असलेला २२ लाख ५४ हजार रुपये किमतीचा पानमसाला व गुटखा पाचोरा शहरातील जळगाव चौफुलीवर पाचोरा पोलिसांनी पकडला. याप्रकरणी गुटखा मालक सनी टेकचंद पंजाबी व गाडी चालक दत्तू लालदास बैरागी या दोघांना अटक करून पाचोरा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघा आरोपींना न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

जळगाव चौफुलीवरील वरखेडी नाक्याजवळ नाकाबंदी करण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे, हेकॉ. राहुल शिंपी, पोकॉ. सुनील पाटील, होमगार्ड संजय पाटील यांचे पथक पहाटे गेले होते. त्यावेळी जामनेरकडून पाचोराकडे येत असलेले एक वाहन पोलिसांना चकवा देत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी हेकॉ. राहुल शिंपी यांनी पाठलाग करीत हे वाहन अडविले.

वाहनाची तपासणी केली असता त्यात गोण्यांमध्ये गुटखा व पान मसाल्याचे पुडे आढळून आले. पंचांसमक्ष हे वाहन जप्त केले. गुटख्याच्या ४७ व सुगंधी तंबाखूच्या ३१ गोण्या अशा २२ लाख ५४ हजार किमतीच्या एकूण ७८ गोण्या तर आठ लाख किमतीचे वाहन पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी मालक सनी टेकचंद पंजाबी वाहन चालक दत्तू लालदास बैरागी यांना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.