गुढीपाडव्याला नवीन कार घेतली, पण दुसऱ्याच दिवशी घडली दुर्दैवी घटना.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कार खरेदी केल्यानंतर कुटुंब आणि मुलांमध्ये आनंद होता. मात्र कार घेतल्यानंतर दोन दिवसांनीच आनंदावर विरजण पडले. गाडीने घराकडे येताना दुसऱ्या एका कारने मागून धडक दिली. यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. देवांश दिनेश महाजन (वय ५) असं अपघाताती मयत मुलाचे नाव असून या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव शहरातील श्रीपतनगर परिसरातील रहिवासी दिनेश महाजन यांनी गुढीपाडव्याला कार खरेदी केली होती. या कारने धुळ्याकडून ते चाळीसगावकडे येण्यासाठी निघाले होते. यावेळी गाडीत दिनेश महाजन यांच्यासोबत त्यांच्या पत्नी स्वाती महाजन, मुलगी आरोही (वय १०) व मुलगा देवांश (वय ५) हे देखील होते. तर त्यांच्या गाडीच्या मागे एक कार देखील चाळीसगावच्या दिशेने येत होती.

चाळीसगाव- धुळे रस्त्यावरील डेराबर्डी भागात दिनेश महाजन यांच्या गाडीला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या डॉ. उत्तमराव महाजन यांच्या कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती, की कारमधील पाच वर्षीय देवांश हा थेट गाडीतून बाहेर फेकला गेला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला व गाडी रस्त्याच्या विरुद्ध दिशेने झाली. या अपघातात दिनेश महाजन, स्वाती महाजन व आरोही महाजन हेही जखमी झाले आहेत. या प्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कार घेतल्याच्या दोन दिवसांनी अपघात घडून मुलाचा मृत्यू झाल्याने आई- वडिलांनी एकच आक्रोश केला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.