मित्राला वाचवायला जीवाची बाजी लावली, आयुष्याची साथ तिथेच सुटली, शेततळ्यात बुडून दोन मित्रांचा मृत्यू.

पाण्यात बुडत असलेल्या आपल्या मित्राला वाचवण्यासाठी दुसरा तरुणही पाण्यात उतरला. परंतु, तळ्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने यावेळी दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गंगापूर सरंजपूर शिवारातील शेततळ्यात उघडकीस आली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.विद्युत मोटर बाहेर काढण्यासाठी एक तरुण शेततळ्यात उतरला. शेवाळं असल्याने पाय घसरुन तो तरुण पाण्यात बुडाला. पाण्यात बुडत असलेल्या आपल्या मित्राला वाचवण्यासाठी दुसरा तरुणही पाण्यात उतरला. परंतु, तळ्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने यावेळी दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गंगापूर(Gangapur) सरंजपूर शिवारातील शेततळ्यात उघडकीस आली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.धनंजय अण्णासाहेब सोनवणे (वय २४, राहणार मालुजा खुर्द तालुका गंगापूर)व रोहित रमेश भांगे (वय २२ राहणार खडका फाटा जळका तालुका नेवासा) अशी मृतांची नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर तालुक्यातील मालुंजा खुर्द येथील अण्णासाहेब सोनवणे यांचे सरंजपूर परिसरात शेततळे आहे.

शेततळ्यापासून(Farm Pond) काही अंतरावर धनंजय याचे कुटुंबीय वास्तव्य करते. रोहित हा नेवासा येथील रहिवासी आहे. त्याच्या आईचे निधन झालं आहे. तो गेल्या काही दिवसांपासून धनंजय याच्याकडे राहायला आला होता.दरम्यान, शेततळ्यात टाकलेल्या मोटर मधून पाणी येत नसल्यामुळे धनंजय सोनवणे(Dhananjay Sonavne) हा रोहितसोबत (Rohit) शेततळ्याजवळ गेला. शेततळ्यात उतरून मोटर(Motor) बाहेर काढत असताना गाळ असल्याने तो पाण्यात बुडू लागला. धनंजयला वाचवण्यासाठी रोहित देखील पाण्यात उतरला. यावेळी धनंजय व रोहित दोघे पाण्यात बुडाले. बराच वेळ झाला तरीही धनंजय घरी न आल्याने धनंजयच्या कुटुंबीयांनी शेततळ्याजवळ धाव घेतली. त्यावेळी दोघेही पाण्यात बुडाण्याचे लक्षात आले. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. दोघांचेही मृतदेह पहाताच कुटुंबीयांनी घटनास्थळी टाहो फोडला.नागरिकांच्या मदतीने धनंजय व रोहित यांचे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र गाळात रुतल्यामुळे दोघांनाही बाहेर काढणे कठीण जात होते. सरतेशेवटी जेसीबी मागवण्यात आला. अथक प्रयत्नांनंतर जेसीबीच्या सह्याने शेततळे फोडून दोघांना बाहेर काढण्यात आले. तातडीने दोघांना उपजिल्हा रुग्णालात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेमुळे नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.