मुंबईत १४व्या मजल्यावरुन पडून २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, घरात तिची डायरी सापडली, गूढ उलगडणार?

 मुंबईतील माटुंग्यात एका इमारतीच्या १४ व्या मजल्यावरुन पडून २० वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असून पोलिसांना या तरुणीची एक डायरी सापडली आहे.मुंबईच्या माटुंगा परिसरातून एक हृयदद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका २० वर्षीय विद्यार्थिनीचा एका इमारतीवरुन पडून मृत्यू झाला आहे. मांटुगा येथील इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरुन पडून या तरुणीचा मृत्यू झाला आहे. तिच्या दोन मैत्रिणींच्या समोरच तिने इमारतीवरुन खाली उडी घेतल्याचं सांगण्यात येत आहे.या प्रकरणाची माहिती मिळताच माटुंगा पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनेची नोंद करत मृतदेह ताब्यात घेतला.

या तरुणीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. प्राथमिक तपासात या तरुणीने इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरुन उडी घेतल्याचं कळत आहे, तरी पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजुंनी तपास करत आहेत. तिच्यासोबत असलेल्या तिच्या मैत्रिणींचाही जबाब नोंदवला जात आहे.याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ही घटना माटुंग्यातील हिंदू कॉलनी येथील टेक्नो हाईट नावाच्या १४ मजली इमारतीत घडली आहे. येथे आपल्या कुटुंबासोबत राहणाऱ्या जना सेठिया नावाच्या मुलीचा इमारतीवरुन पडून मृत्यू झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जना सेठिया ही बी. कॉमच्या तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास टेक्नो हाईट या इमारतीच्या १४ व्या मजल्यावरुन पडून तिचा मृत्यू झाला. ती याच इमारतीच्या आठव्या मजल्यावर आपल्या कुटुंबासोबत राहत होती. मंगळवारी संध्याकाळच्या वेळी सेठिया ही तिच्या दोन मैत्रिणींसोबत इमारतीच्या गच्चीवर गेली होती. तिथे या मैत्रिणींना काही कळायच्या आत सेठियाने इमारतीवरुन थेट खाली उडी घेतली. हे पाहून तिच्या मैत्रिणी खूप घाबरल्या, तिने तिच्या कुटुंबाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर सेठियाला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तिथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं.याप्रकरणी पोलिसांना कुठल्याही प्रकारची सुसाईड नोट सापडलेली नाही. पण, पोलिसांना सेठियाची एक डायरी सापडली आहे, ज्यामध्ये तिने आत्महत्येच्या विचाराबाबत लिहिलेलं आढळलं आहे. सेठियाच्या मैत्रिणींनुसार, प्रेमात यश न मिळाल्याने ती नैराश्यात होती. सध्या पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.