अल्पवयीन मुलगी सोनोग्राफीसाठी आली अन् हादरवणाऱ्या घटनेचा पर्दाफाश, प्रकरण काय?

बुलढाण्यात अल्पवयीन मुलगी रुग्णालयात गेली आणि हादरवणारी घटना समोर आली. या घटनेनंतर पोलिसांनी पाच जणांवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.बालविवाह रोखण्यासाठी केंद्र पातळीवर देखील मोठ्या कडक कायदे संसदेत केले जातात. पण त्याची अंमलबजावणी किंबहुना जनजागृती होते किंवा नाही याचं चित्र आज पुन्हा एकदा पाहायला मिळालं. बुलढाण्यात एक १७ वर्षीय मुलगी रुग्णालयात सोनोग्राफीसाठी येते त्यावेळी बालविवाहची बाब समोर आली आहेबुलडाणा जिल्ह्यात खामगाव शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीचा विवाह करुन तिला गर्भवती केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी वय १७ वर्षे ११ महिने, रा. मलकापूर, हीचे आरोपी अजय वय २५, रा. मलकापूर याच्यासोबत बालविवाह लावण्यात आला. मुलीकडील काही लोकांनी कट रचून हा विवाह घडवून आणल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.

हा प्रकार १९ मे २०२४ ते १ एप्रिल २०२५ या कालावधीत घडला. अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती झाली आणि तिला ३१ मार्च २०२५ रोजी प्रसूतीसाठी खामगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, प्रकृती बिघडल्याने तिला अकोला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे सिझेरिन प्रसूतीद्वारे तिने मुलाला जन्म दिला.पोलीस उपनिरीक्षक राजेश गोमासे यांनी पीडितेचा जबाब नोंदवल्यानंतर खामगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध कलम ३७६(२) (N) सह पोक्सो कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. एका अल्पवयीन मुलीच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्या आरोपींना कठोर शासन व्हावं, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.भारतात बालविवाह प्रतिबंध कायदा, २००६ अंतर्गत मुलाने वयाची एकवीस वर्षे पूर्ण केली नसतील आणि स्त्रीने वयाची अठरा वर्षे पूर्ण केली नसतील तर बालविवाह केला जात नाही. हा कायदा असंही घोषित करतो, की कायदेशीर वयोमर्यादेपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये होणारं कोणतंही लग्न रद्दबातल आहे.लहान वयात लग्न झाल्यामुळे आपल्या लैंगिकतेविषयी पुरेसे ज्ञान या मुलींना नसतं. कुटुंबनियोजन, गर्भधारणा आणि गर्भारपणात घ्यायची काळजी हे तर फारच दूरचे विषय असतात. त्यामुळे त्यांना कधीकधी आपलं बाळ जगात येण्याआधी, कधी जन्मानंतर लगेच, तर कधी जन्मानंतर एक-दोन वर्षात गमवावं लागतं. बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे. अशा पद्धतीने बालविवाह समोर आल्यानंतर कायद्याचा धाक राहिला नसल्याचं चित्र असून याला कुठेतरी कडक निर्बंध लावणं गरजेचं आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.