बदलापूरच्या बेलवली परिसरात अनंत कराळे यांचा एक व्यावसायिक गाळा असून तो खान कॅटरर्स यांना भाड्याने दिला आहे.बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं हादरेललं बदलापूर (Badlapur) आणखी एका घटनेनं हादरलं असून पोटच्या लेकानेच वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रॉपर्टी आणि पैशाच्या वादातून गप्पा मारता मारता ही घटना घडली. अनंत कराळे असं हत्या झालेल्या वडिलांचं नाव असून बेलवली परिसरात घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी मुलगा गणेश कराळे याला ताब्यात घेतलं आहे.










