बेळगाव शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात बस चालकाने बसमध्येच गळफास घेत आपलं आयुष्य संपवलंय. बेळगाव शहरातील बस डेपोमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.बेळगाव शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात बस चालकाने बसमध्येच गळफास घेत आपलं आयुष्य संपवलंय. सुट्टी न दिल्याने नाराज झालेल्या बस चालकाने बसमध्येच आत्महत्या करत हे टोकाचे पाऊल उचललं आहे. या घटनेमुळे बेळगावात एकच खळबळ उडाली आहे. भालचंद्र एस. तुकोजी (वय 54) असे आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव आहे.पुढे आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, भालचंद्र तुकोजी यांच्या भाचीचे लग्न होते. त्यामुळे भालचंद्र यांनी वरिष्ठाच्याकडे रजा मागितली होती.पण वरिष्ठानी सुट्टी देण्यास नकार दिला. त्यामुळे नाराज झालेल्या भालचंद्र यांनी बेळगाव आगार क्रमांक दोनमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.










