जळगावच्या उपसरपंचाला एका वाहनाने धडक दिली आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, हा अपघाती मृत्यू नसून त्यांचा घातपात झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.चाळीसगाव-धुळे महामार्गावर भोरस शिवारात मंगळवारी १ एप्रिल रोजी रात्री अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भाजपचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच प्रकाश पाटील यांचा मृत्यू झाला. मात्र, हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या संशयावरून चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात मोठा तणाव निर्माण झाला होता.










