घरच्या लक्ष्मीनेच केला घात, सूनेने सासूला संपवलं, जालना हादरलं.

जालना येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. आईसमान असलेल्या सासूबाईंची घरच्या सूनेने भींतीवर डोके आपटत पहाटे-पहाटे हत्या केली आहे. त्यानंतर मृतदेह एका पोत्यात भरत तिथून सून फरार झालीये. नेमकं काय घडलं? जाणून घ्या. महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यामधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरातील सूनेने आपल्या सासूची हत्या केल्याने जालन्यामध्ये खळबळ उडाली आहे. भिंतीवर डोक आपटून सूनेने आपल्या सासूला संपवलं असून आरोपी सून आपल्या साथीदारासह फरार झाली आहे. भोकरदन नाका परिसरामधील प्रियदर्शनी कॉलनी या परिसरामध्ये ही घटना घडली आहे. कौटुंबिक कारणातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समजत आहे. सविता शिंगारे असं मयत महिलेचे नाव आहे.

जालना येथील आकाश संजय शिंगारे याचा विवाह परभणीतील प्रतीक्षा सोबत झाला होता आकाशा खाजगी कंपनीमध्ये नोकरी करत असून लातूरला राहतो तर प्रतीक्षा ही सासू-सविता सोबत जालन्यात राहत होती आज पहाटे सासू सविता हिचा भीतीवर डोके आपटून सून प्रतीक्षा यांनी खून केला त्यानंतर सविताचा मृतदेह गोनीत भरून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होती मात्र तिला मृत्यू घेऊन जाता आलं नाही दरम्यान प्रतीक्षा शिनगार ही पहाटे पाचच्या सुमारास घरातून बाहेर पडताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कधी झाले प्रतिशा शिंगारे ही साथीदाराच्यामदतीने फरार झाले असून तिला शोधण्यासाठी पोलिसांचे दोन पथक रवाना झाले आहे. पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही फुटेज आपल्या ताब्यात घेतले आहेत.दरम्यान, आपल्या घरच्या सूनबाईने सासूला संपवल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरची सूनबाई सासूच्या जीवावर उठल्याने परिसरातून शोक व्यक्त केला जातो आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सूनने नेमकं कोणत्या कारणामुळे इतका टोकाचा निर्णय का घेतला हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कौटुंबिक भांडणं म्हटलं तरी पहाटे थेट सासूला संपण्याइतपत काय झालं होतं? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांच्या तपासानंतर सर्व गोष्टीचा उलगडा होणार आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.