विद्यार्थिनीच्या वडिलांना शिक्षिकेने जाळ्यात ओढलं, व्हिडिओ कॉलही झाले, शेवटी मॅडमनी…

सतीश हे बंगळुरुच्या पश्चिम भागात पत्नी आणि तीन मुलींसोबत राहतात. ते व्यापारी आहेत. २०२३ मध्ये त्यांची सर्वात धाकटी मुलगी शाळेत जाऊ लागली. त्यावेळी त्यांची ओळख श्रीदेवी रुदागी नामक शिक्षिकेशी झालीशाळेतील विद्यार्थिनीच्या वडिलांना ब्लॅकमेल करुन चार लाख रुपयांची खंडणी  उकळल्याप्रकरणी एका शिक्षिकेला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. संबंधित शिक्षिकेचे एका विद्यार्थ्याच्या वडिलांसोबत प्रेमसंबंध होते. क्राईम ब्रँचने कारवाई करत बंगळुरुतील २५ वर्षीय शिक्षिका श्रीदेवी रुदागी आणि तिचे साथीदार गणेश काळे (वय ३८) आणि सागर (वय २८) यांना अटक केली आहे. त्यांनी पीडित सतीश (नाव बदललेले) यांच्याकडून ४ लाख रुपये उकळले. त्यानंतर दोघांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ दाखवून आणखी २० लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.सतीश हे बंगळुरुच्या पश्चिम भागात पत्नी आणि तीन मुलींसोबत राहतात. ते व्यापारी आहेत. २०२३ मध्ये त्यांची सर्वात धाकटी मुलगी शाळेत जाऊ लागली. त्यावेळी त्यांची ओळख श्रीदेवी रुदागी नामक शिक्षिकेशी झाली. सतीशच्या म्हणण्यानुसार, श्रीदेवीने संपर्क वाढवला. दोघांमध्ये मेसेज आणि व्हिडिओ कॉल सुरु झाले.

यासाठी त्यांनी वेगळे सिम कार्ड आणि फोन वापरले. हळूहळू त्यांच्या भेटी वाढल्या आणि निर्माण झालेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीदेवीने सुरुवातीला सतीशकडून ४ लाख रुपये घेतले. त्यानंतर जानेवारी महिन्यात तिने आणखी १५ लाख रुपयांची मागणी केली. सतीश पैसे देण्यास तयार नव्हता. त्यामुळे ती ५० हजार रुपये उसने मागण्याच्या बहाण्याने त्याच्या घरी गेली.सतीशच्या व्यवसायात नुकसान झाले होते. त्यामुळे त्याने कुटुंबाला गुजरातला हलवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याला शाळेचा दाखला हवा होता. मार्चच्या सुरुवातीला सतीश शाळेत गेला असता, तिच्या ऑफिसमध्ये काळे आणि सागर आधीपासूनच होते. त्यांनी सतीशला त्यांचे खासगी फोटो आणि व्हिडिओ दाखवले. जर २० लाख रुपये दिले नाही, तर हे फोटो आणि व्हिडिओ त्याच्या कुटुंबाला पाठवण्याची धमकी दिली.सतीशने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.

त्याने १५ लाख रुपये देण्याचे ठरवले. त्याने १.९ लाख रुपये लगेच दिले. पण त्यांची मागणी वाढतच राहिली. १७ मार्चला श्रीदेवीने सतीशला फोन केला. तिने सांगितले की, ५ लाख रुपये एका माजी पोलीस अधिकाऱ्याला द्यायचे आहेत. सागर आणि काळे यांना प्रत्येकी १ लाख रुपये द्यायचे आहेत. आणि ८ लाख रुपये स्वतःसाठी ठेवायचे आहेत.सतीशने पोलिसांना फोन केला. पोलिसांनी तपास केला. त्यात तो पोलीस अधिकारी यात सामील नसल्याचे समजले. पोलिसांनी श्रीदेवी, सागर आणि काळे यांना अटक केली. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
सतीशने पोलिसांना सांगितले, “त्यांनी मला धमकावले आणि पैशाची मागणी केली. माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मी खूप अडचणीत आलो होतो.” पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सतीशने केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.