पुण्यात पुन्हा हिट अ‍ॅंड रन! वाहनाच्या धडकेत उंड्रीत सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू; चालक पसार.

उंड्री परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास घडली.उंड्री परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास घडली. सुजितकुमार बसंतप्रसाद सिंग (वय ४९, रा. हांडेवाडी रोड, उंड्री) असे मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.अपघातानंतर धडक देणारा वाहनचालक सिंग यांच्या मदतीसाठी न थांबता तेथून पसार झाला. या प्रकरणी अर्चना सुजितकुमार सिंग यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून काळेपडळ पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळेपडळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजितकुमार हे लष्करातून निवृत्त झाले आहेत. ते हांडेवाडी रस्त्यावरील विद्यानिकेतन सोसायटीत राहतात.

दरम्यान, मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास न्याती इबोनी सोसायटीच्या सुरक्षा भिंतीसमोरील मुख्य रस्त्यावर एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. नागरिकांनी ही माहिती पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर काळेपडळ पोलिस ठाण्याचे बीट मार्शल घटनास्थळी दाखल झाले.सिंग यांच्या डोक्यातून व नाकातून रक्त येत असल्याने त्यांना तत्काळ ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारांपूर्वीच त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर हा ‘हिट अँड रन’चा प्रकार असल्याचे समोर आले आहे. सिंग सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. त्या वेळी हा अपघात झाला. सिंग यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नव्हती. त्यामुळे सुरुवातीला त्यांची ओळख पटविणे आणि त्यांच्या नातेवाइकांचा शोध घेणे, यात पोलिसांना कसरत करावी लागली. दरम्यान, ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांची पडताळणीकरून पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.चालू वर्षातील प्राणांतिक अपघाताच्या घटना

■ १५ मार्च: उंड्री येथे फूड डिलिव्हरी बॉयला अज्ञात दुचाकीने धडक दिल्याने डिलिव्हरी बॉयच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. धडक देणारा दुचाकीस्वार मदत न करता झाला पसार. ■ १४ फेब्रुवारी: भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचाकी ८० वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना हांडेवाडी रस्त्यावर चिंतामणीनगर येथे घडली. ■ २९ जानेवारी : भरधाव कंटेनरच्या धडकेत मोटारचालक तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर-सासवड रस्त्यावर घडली. अपघातानंतर कंटेनरचालक पसार. ■ २५ जानेवारी: दुचाकीवरून चाललेल्या दाम्पत्याला चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिक डोक्यावर पडले. यात गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठाचा उपचारादरम्यान मृत्यू. धडक देणारा वाहनचालक पसार. ■ २१ जानेवारी : हांडेवाडी-उरुळी देवाची मार्गावर कचरा डेपोशेजारी अवघ्या १४ महिन्याच्या चिमुकल्याच्या अंगावरून महापालिकेच्या टँकरचे चाक गेल्याने जागीच मृत्यू.
■ ८ जानेवारी : भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार डॉक्टर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज हांडेवाडी रस्त्यावर घडली. ट्रकचालकाला पोलिसांनी अटक केली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.