गुजरातमध्ये भीषण स्फोटात १० ठार अनेक जखमी.

अहमदाबाद : गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील डिसा येथील एका फटाक्याच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. त्यामध्ये, 10 जणांचा मृत्यू झाला असून काहीजण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच डिसा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय चौधरी यांनी याबाबत माहिती देताना म्हटले की, येथील एका फटाक्याच्या फॅक्टरीत आग लागल्याची घटना घडली,

त्यानंतर कंपनीत एकापाठोपाठ एक स्फोट घडून आले. त्यामध्ये, कंपनीतील काही कामगार अडकले.बनासकांठाच्या जिल्हाधिकारी मिहीर पटेल यांनीही माहिती देताना म्हटले की, आज सकाळी आम्हाला डिसा येथील औद्योगिक वसाहतीत एका फॅक्टरीत स्फोट झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर, अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत

आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, या आगीच्या दुर्घटनेत कंपनीतील 10 कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत काही कामगार जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, स्फोटाची दाहकता एवढी भीषण होती की, फॅक्टरीतील भींतीही ढासळल्याचं पाहायला मिळालं.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.