मालवणी फक्त बोली भाषा नसून ती प्रदेशनिष्ठ संस्कृतीची वाहक.! : सतीश लळीत. ; शिरोडा येथे रंगले मालवणी साहित्य संमेलन.

वेंगुर्ला : मालवणी ही केवळ एक मराठीची बोली भाषा नसून ती लोक संस्कृती, खाद्यसंस्कृती, निसर्ग, पर्यावरण, आतिथ्यशीलता, प्राचीन परंपरा आणि चिकित्सकपणा यांचा संगम असलेल्या प्रदेशनिष्ठ संस्कृतीची वाहक आहे, असे प्रतिपादन येथे भरलेल्या मालवणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी येथे केले.आजगाव येथील ‘साहित्य प्रेरणा कट्टा’ या संस्थेने शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयात आयोजित केलेल्या मालवणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाचे निमंत्रक तथा साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर, उद्योजक रघुवीर तथा भाई मंत्री, ग्रंथालयाचे अध्यक्ष राजन शिरोडकर, कार्यवाह सचिन गावडे, कवी रुजारीओ पिंटो आणि मालवणी भाषाप्रेमी तथा व्यापारी नितीन वाळके आदी उपस्थित होते. दीपप्रज्वलन व गाऱ्हाण्याने संमेलनाची सुरुवात झाली. स्थानिक कलावंत रवी पणशीकर याने दणक्यात गाऱ्हाणे घातले. सतीश लळीत आपल्या भाषणात म्हणाले, मी मालवणी लेखक नसतानाही मालवणी बोलीच्या प्रसार व विकासासाठी केलेले काम लक्षात घेऊन आयोजकांनी माझी निवड अध्यक्षपदासाठी केली. लेखक नसलेल्या एका कार्यकर्त्याला हा मान देऊन त्यांनी मालवणीसाठी झटणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान केला आहे.

आधुनिकीकरणाच्या धबडग्यात सगळ्याच प्रादेशिक भाषा आणि विशेषतः बोलीभाषा यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्हे उभी राहिली आहेत. परंतु केवळ ‘बोली कशा टिकणार?’ ही चिंता व्यक्त करून काही साध्य होणार नाही. त्यासाठी अशी छोटी छोटी बोली साहित्याची संमेलने होणे आवश्यक आहे. अशा प्रामाणिक हेतूने भरवलेल्या संमेलनामुळेच बोलीभाषा टिकून राहण्यास खरी मदत होणार आहे. या संमेलनाच्या व्यासपीठावरून होणारे मंथन मालवणीच्या विकासासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरेल.’ आजगाव साहित्य कट्ट्याचा त्रेपन्नाव्या कार्यक्रमाचे औचित्य साधून खटखटे ग्रंथालयाच्या मच्छिंद्र कांबळी सभागृहात हे संमेलन आयोजित केले होते. कवी सौदागर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर नितीन वाळके यांनी मनोगत व्यक्त केले. पहिल्या सत्राच्या शेवटी सतीश लळीत यांचे अध्यक्षीय भाषण झाले.  लळीत म्हणाले की, मालवणी बोलीबद्दल बरेचसे गैरसमज आहेत. मालवणी बोली ही शिव्यांची बोली असून ती उथळ विनोदी लेखनासाठी योग्य आहे, असा एक गैरसमज पसरलेला आहे. तो दूर करण्यासाठी मालवणी बोलीत लेखन करणाऱ्यांनी केवळ विनोद किंवा मनोरंजन यासाठी लेखन न करता गंभीर विषयावरही लेखन करणे आवश्यक आहे. मालवणी बोलीतील लोककथा, लोकगीते, ओव्या, कोडी, म्हणी ही एक फार मोठी मौखिक परंपरा आहे. या मौखिक परंपरेचे संकलन आणि संशोधन होणे आवश्यक आहे. अन्यथा काळाच्या ओघात हा मौल्यवान खजिना नष्ट होऊन जाईल. गंभीर लेखनासाठी मालवणी बोलीचा वापर झाल्याची उदाहरणे यापूर्वीही घडली आहेत.

कोकण रेल्वेचे आद्य प्रवर्तक अ. ब. वालावलकर यांनी गीतेचे मालवणीमध्ये रूपांतर केले आहे त्यांनी मालवणीत केलेले रूपांतर अतिशय अर्थपूर्ण आणि सहजसोपे आहे. यावरून मालवणी ही केवळ उथळ आणि वरवरची बोली नसून वेदांत समजावून सांगण्याची ताकदसुद्धा तिच्यात आहे, हे सिद्ध होते.मालवणी म्हटले की केवळ मालवणी बोली असे गृहीत धरले जाते. परंतु ते खरे नाही, असे सांगून श्री. लळीत म्हणाले की, मालवणी ही एक वेगळी संस्कृती आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामरचना, वास्तुशैली, मंदिरे, रुढीपरंपरा, इथली खाद्यसंस्कृती, लोककला, गावोगावच्या जत्रा, इथला निसर्ग आणि पर्यावरण, चिकित्सक बेरकी आणि आतिथ्यशील मालवणी माणूस हे सगळे मिळून एक बहुरंगी बहुढंगी अशी संस्कृती इथे बहरली आहे. इथला माणूस जी बोली बोलतो, ती या संस्कृतीची वाहक आहे. आधुनिकीकरणाच्या जमान्यात जीवनाच्या सर्वच अंगावर बरे वाईट परिणाम होत आहेत. मालवणी बोलीवरही असा परिणाम होत आहे. परंतु इथली संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येकाने मालवणी बोलीचा वापर करायला हवा. जोपर्यंत मालवणी संस्कृती, मालवणी मुलखाची वैशिष्ट्ये जिवंत आहेत, तोपर्यंत मालवणी बोलीला कोणतीही भीती नाही. मालवणी घरे टिकवा असे आवाहन करतानाच कोकणच्या भौगोलिक, सांस्कृतिक संस्कृती जपली पाहिजे असे प्रतिपादनही श्री.सतीश लळीत यांनी केले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.