राज्यात “जिवंत सातबारा” मोहीम सुरू; वारसांच्या नोंदी अद्ययावत करून घेण्याचे आवाहन.

राज्यात “जिवंत सातबारा” मोहीम सुरू; वारसांच्या नोंदी अद्ययावत करून घेण्याचे आवाहन.

जळगाव, दिनांक 02  : महसुल विभाग 100 दिवस कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने राज्यात “जिवंत सातबारा” मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत, सातबारावरील मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अद्ययावत केल्या जाणार आहेत. या मोहिमेचा मुख्य उद्देश मयत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनी संबंधित कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद वेळेत व्हावी हा आहे. अनेकदा वारसांची नोंद नसल्यामुळे अडचणी येतात, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील ज्या नागरिकांच्या सातबारावर अशा नोंदी राहिल्या असतील त्यांनी तलाठ्या कडे जाऊन आपल्या नोंदी करून घ्याव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

मोहिमेचा कार्यक्रम: १ एप्रिल, २०२५ ते ५ एप्रिल, २०२५: तलाठी गावांमध्ये चावडी वाचन करून मयत खातेदारांची यादी तयार करतील.६ एप्रिल, २०२५ ते २० एप्रिल, २०२५: वारसांनी आवश्यक कागदपत्रे तलाठ्यांकडे जमा करायची आहेत. तलाठी पडताळणी करून वारस ठराव मंजूर करतील.२१ एप्रिल, २०२५ ते १० मे, २०२५: तलाठी वारस फेरफार तयार करतील आणि मंडळ अधिकारी ७/१२ दुरुस्त करतील.या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मयत खातेदारांच्या याद्या तलाठी यांचेमार्फत तयार करण्यात येत आहेत. संबंधित मयत खातेदार यांचे वारसांनी मृत्यू प्रमाणपत्र व वारसांची माहिती संबंधित तलाठी यांचेकडे द्यावी.

या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तहसीलदारांना समन्वय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्याना नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त विभागीय स्तरावर देखरेख ठेवणार आहेत. सातबारावरील मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व वारस नोंदी घेऊन ७/१२ “जिवंत” म्हणजेच अद्ययावत करणेसाठी वर नमूद केल्याप्रमाणे विहित कालबध्द कार्यक्रम राबवावा व “जिवंत ७/१२” मोहिम यशस्वी होईल याची दक्षता घ्यावी, तसेच गावकऱ्यांनी आपआपल्या गावातील तलाठ्यांना भेटून “जिवंत ७/१२” मोहिमेचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.