ईस्पोर्ट्सच्या विकासासाठी सर्व भागधारकांचे सहकार्य आवश्यक – केंद्रिय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे.

ईस्पोर्ट्सच्या विकासासाठी सर्व भागधारकांचे सहकार्य आवश्यक – केंद्रिय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे. जळगाव,केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया (PEFI) आणि क्राफ्टन व इन्व्हेस्ट इंडिया यांच्या सहकार्याने आयोजित Esports Conclave 2025 मध्ये सहभाग घेतला. भारताला जागतिक ईस्पोर्ट्स क्षेत्रात अग्रस्थानी नेण्यासाठी धोरणात्मक चर्चा आणि संधींवर भर देण्यात आला. राज्यमंत्री खडसे यांनी ईस्पोर्ट्सच्या माध्यमातून डिजिटल साक्षरता वाढवणे, रोजगार निर्मिती आणि त्याला मुख्य प्रवाहातील क्रीडा प्रकार बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच, ईस्पोर्ट्स क्षेत्रातील प्रतिभा आणि नवोपक्रम वाढवण्यासाठी सर्व भागधारकांनी एकत्र काम करण्याचे आवाहन केले.

युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाने ईस्पोर्ट्समधील पदक विजेत्यांना रोख प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. 2022 मध्ये भारतात सुमारे 6 लाख ईस्पोर्ट्स खेळाडू होते, ही संख्या झपाट्याने वाढत असून पुढील पाच वर्षांत 10 लाखांहून अधिक खेळाडू होण्याची शक्यता आहे.

या परिषदेत क्राफ्टन इंडिया चे CEO सीन ह्युनिल सोन आणि अन्य उद्योगतज्ज्ञांनी ईस्पोर्ट्सच्या वाढीचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम याविषयी चर्चा केली. तसेच इन्व्हेस्ट इंडिया चे वरिष्ठ उपाध्यक्ष अमूल्य साह, उत्तर प्रदेश ऑलिम्पिक असोसिएशन चे महासचिव आनंदेश्वर पांडे, PEFI चे राष्ट्रीय सचिव पीयूष जैन यांच्यासह अनेक अधिकारी व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.