मयत वैभव आणि आरोपी अंकुश हे शेजारी राहत होते. वैभव याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय अंकुश याला होता. याच रागातून त्याने वैभवच्या मानेवर कोयत्याने वार केले.अनैतिक संबंधांच्या (Extra Marital Affair) संशयातून पुण्यात एका २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. कोयत्याने वार करून त्याचा जीव घेण्यात आला. मंगळवारी रात्री ७:४५ च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. पुणे जिल्ह्यात (Pune Crime) मावळ तालुक्यातील कान्हे गावातील आंबेवाडी येथील शनि मंदिराजवळ हा प्रकार घडला आहे. या हत्येने संपूर्ण मावळ तालुका हादरला असून परिसरात खळबळ उडाली आहे.वैभव उमेश सातकर (वय २२, रा. आंबेवाडी, कान्हे) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर अंकुश जयवंत सातकर (वय ४२, रा. आंबेवाडी, कान्हे) याने हत्या केल्याचा आरोप आहे.










