बारामतीतील माळेगावमध्ये नववीतील मुलीचा फोटो वापरून तिची बदनामी करण्याचा प्रकार इंस्टाग्रामवर घडला. तांत्रिक विश्लेषणानंतर पोलिसांनी एकाला अटक केलीये. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्याचा मोबाईल देखील जप्त केला आहे. या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाल्याचेही बघायला मिळतंय.आजच्या आधुनिक इंटरनेट युगात फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट यासारखे अनेक समाज माध्यम उपलब्ध असून, त्यातून एक स्वतंत्र आभासी दुनिया निर्माण झालेली आहे. अनेक तरुण-तरुणी या आभासी दुनियेत वावरत असताना मनाला वाटेल तसा समाज माध्यमांचा गैरवापर करत असल्याचे अनेक प्रकार घडत आहे. असाच एक प्रकार बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळेगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एका गावातील नववीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा फोटोचा वापर करून तिची बदनामी होईल.










