तरुणाला भरदिवसा दोघांनी संपवलं, प्रेमप्रकरणातून घडली भयंकर घटना; बीड हादरलं.

 बीडमध्ये एका तरुणावर दोघांनी सपासप वार करुन त्याला गंभीर जखमी केले, याघटनेत उपचारादरम्यान अतिसक्तस्त्राव झाल्याने त्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याची माहिती आहे.बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. येथे दोन युवकांकडून दिवसाढवळ्या एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या घटनेत उपचारादरम्यान त्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी (१ एप्रिल) सकाळी ९ वाजताच्या दरम्यान घडल्याची माहिती आहे. आहे. राजकुमार साहेबराव करडे (वय ३०, रा. गवळीपुरा, अंबाजोगाई) असं या हल्ल्यात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याची माहिती आहे.दोन युवकांनी कोयता सदृश धारदार हत्याराने राजकुमारच्या गळ्यावर, डोक्यात, पाठीवर सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले आहे.

जखमी युवकावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.अंबाजोगाई शहराला सुसंस्कृत म्हटले जाते. मात्र, याच शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अंबाजोगाई शहरातील पोखरी रोडवर सारडा नगरी जवळ दोन तरुणांनी राजकुमार साहेबराव करडे या तरुणाच्या गळ्यावर, डोक्यात, पाठीवर कोयता सदृश्य धारदार हत्याराने सपासप वार करून त्यास गंभीर जखमी केले. या हल्ल्यात राजकुमार गंभीर जखमी झाला. त्याच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू होती. मात्र डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही अतिरक्तस्त्रावामुळे राजकुमारचा उपचार सुरु असतानाच मृत्यू झाला.दरम्यान, हा हल्ला कोणी व कोणत्या कारणामुळे केला याबाबत सध्या कुठलीही अधिकृत माहिती नाही. अंबाजोगाई शहर पोलीस याप्रकरणाचा तपास करत असून लवकरच याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद होणार असल्याचे समजते. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रेमप्रकरणातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती आहे.मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड घटनेने जिल्हा हादरून गेलेला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात रोज नवनवीन घटना समोर येत असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.