‘येशू येशू’ फेम पास्टर बजिंदर सिंगला जन्मठेप, महिला अत्याचाराच्या प्रकरणात कोर्टाचा निकाल.

येशू येशू फेम पास्टर बजिंदर सिंगला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला महिला अत्याचाराच्या प्रकरणी दोषी ठरवले आहे.’येशू-येशू’ म्हणणारे ख्रिश्चन धर्मगुरु पास्टर बजिंदर सिंगला बलात्कार प्रकरणात शिक्षा झाली आहे. मोहालीच्या जिल्हा न्यायालयाने बजिंदर सिंग यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.तीन दिवसांपूर्वी मोहाली कोर्टाने त्यांना दोषी ठरवले होते. यानंतर त्याला पटियाला तुरुंगात पाठवण्यात आले. या पास्टरचे सोशल मीडियावर अनेक फोलोअर्स आहेत. शिवाय याच्या कार्यक्रमाला अनेकांची गर्दी होत असे हा अनेक व्याधी क्षणात दूर करण्याचा दावा करत असे.२०१८ मध्ये जीरकपूर पोलीस स्थानकात एका महिलेने तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीच्या आधारावर हा खटला चालला. तक्रार करणाऱ्या महिलेने सांगितले की, बजिंदर सिंगने तिला विदेशात पाठवण्याचे आमिष दाखवले. तसेच मोहाली सेक्टर ६३ मधील घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

त्याने या घटनेचा व्हिडिओही बनवला. महिलेने असा आरोप केला होता की, बजिंदरने तिला धमकी दिली होती. जर तिने त्याच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर तो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करेल.पास्टर बजिंदर सिंगने स्वतःला निर्दोष असल्याचे सांगितले होते. पण न्यायालयाने त्याला दोषी ठरवले. पास्टर बजिंदर सिंग यांच्यावर आणखी एक आरोप आहे. २८ फेब्रुवारीला त्यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाला आहे. कपूरथला पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक विशेष तपास पथक (SIT) तयार केले आहे. एका २२ वर्षांच्या तरूणीने त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. सिंगने मात्र हे सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे.दरम्यान, पास्टर बजिंदर सिंगचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये तो एका महिलेला मारहाण करताना दिसत आहे. मोहाली पोलिसांनी २५ मार्च रोजी सिंगविरुद्ध मारहाण आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पादरी एका महिलेशी वाद घालत आहे. तसेच तिला कानशिलात लगावत आहे.व्हिडिओमध्ये तो महिलेवर आधी पुस्तक फेकतो आणि नंतर तिच्याजवळ जाऊन तिला मारतो, असे दिसत आहे. या सर्व घटनांमुळे पास्टर बजिंदर सिंग अडचणीत आला होता. न्यायालयाने त्यांना बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने खळबळ उडाली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.