भयंकर! फटाका कारखान्यात स्फोट, १७ जण जिवंत जळाले; काही जण ढिगाऱ्याखाली अडकले, मालक फरार.

गुजरातच्या बनासकांठामध्ये एका फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.गांधीनगर: गुजरातच्या बनासकांठामध्ये एका फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात १७ जणांचा मृत्यू (Gujrat Firecracker Company Blast) झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. कारखान्यात असलेल्या बॉयलरचा स्फोट झाला. त्यामुळे ही दुर्घटना घडली. स्फोट झाला तेव्हा कारखान्यात ३० कामगार काम करत होते. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान पोहोचले असून आग विझवण्याचं काम सुरु आहे.बनासकांठातील डीसा भागात असलेल्या फटाका कारखान्यात सकाळी नऊच्या सुमारास स्फोट झाला. स्फोटाचा आवाज ऐकताच आसपासचे लोक कारखान्याजवळ पोहोचले. तेव्हा कारखान्यातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. याची माहिती लगेच एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाला देण्यात आली.

दुर्घटनेचा एक व्हिडीओ (Gujrat Blast Video) समोर आला आहे. त्यात कारखान्यातील भिंतींचं स्फोटांमुळे मोठं नुकसान झाल्याचं दिसत आहे. टिनची शेड कोसळली आहे. आग मोठी असल्यानं धुराचे लोट निघत आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचा आवाज बराच दूरपर्यंत ऐकायला गेला. स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरला.डीसा ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटामुळे कारखान्याच्या एका भागाचं मोठं नुकसान झालं. भिंती, छप्पर कोसळलं असून ढिगाऱ्याखाली काही कामगार अडकले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. स्फोटाच्या तपासाचे आदेश देण्यात आलेले आहेत.दीपक ट्रेडर्स नावाच्या कारखान्यात स्फोट झाला. या ठिकाणी फटाके तयार केले जातात. स्फोटानंतर कारखान्याचा मालक फरार झाला आहे. जिल्हाधिकारी माहिर पटेल घटनास्थळी पोहोचले आहेत. या कारखान्याला फटाके तयार करण्याचा परवाना मिळाला होता की नाही, याची चौकशी केली जात आहे.फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे गोदामाचा काही भाग कोसळला. ढिगाऱ्याखाली काही मजूर अडकले आहेत. ढिगारा हटवून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती डीसाच्या उपजिल्हाधिकारी नेहा पांचाळ यांनी दिली. डीसा नगरपालिकेच्या सुचनेवरुन अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती पांचाळ यांनी दिली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.