अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर एका टीसीने आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मुर्तीजापुरात रेल्वे टीसीने टोकाचे पाऊल उचलत रेल्वेसमोर उडी घेत आपलं जीवन संपवलय.अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर एका टीसीने आत्महत्या (Akola Crime News) केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मुर्तीजापुरात तिकीट तपासणीकाने अर्थातच रेल्वे टीसीने टोकाचे पाऊल उचलत रेल्वेसमोर उडी घेत आपलं जीवन संपवलय. मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावरच मालगाडी समोर उडी घेत टीसीने आत्महत्या केली आहे. काल (31 मार्च) रात्रीच्यादरम्यान ही आत्महत्येची (Crime News) घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक कलहातून टीसीने टोकाची भूमिका घेतल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. सुमेध मेश्राम असं या आत्महत्या करणाऱ्या रेल्वे टीसीचं नाव आहे. विशेष म्हणजे सुमेध मेश्रावर यांच्यावर अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीचा गंभीर स्वरूपाचा गुन्हे दाखल आहे. पोलीस अटक करणार होते, याच भीतीने मेश्राम यांनी आत्महत्येसारखं टोकाचं उचलल्याचं बोललं जाते आहे.










