अचानक टायर फुटला, गाडी डिव्हायडरवर धडकली, कार २०० फूट लांब जाऊन पलटी; नागपुरात अंगावर काटा आणणारा अपघात.

नागपुरात एक भीषण अपघात घडला आहे. धावत्या कारचा टायर फुटल्याने चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट डिव्हायडरवर जाऊन धडकली. त्यानंतर ही कार २०० फूट लांब जाऊन पलटी झाली.नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील धामणा उड्डाणपुलावर रविवारी रात्री एका कारचा भीषण अपघात झाला. कारचा पुढील टायर अचानक फुटला आणि कार पलटी होऊन २०० फूट दूर गेली. या अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात कार चालक अक्षय कठाणे (वय २७, रा. बडनेरा, अमरावती) हा गंभीर जखमी झाला असल्याची माहिती आहे. सुदैवाची बाब म्हणजे पुलावर लावलेल्या लोखंडी बॅरिकेडिंगमुळे गाडी पुलाखाली पडली नाही आणि मोठा अपघात टळला. अन्यथा मोठी दुर्घटना होऊ शकली असती.अक्षय कठाणे हे त्यांच्या कारने बडनेराहून नागपूरला येत होते. प्रवासादरम्यान धामणा उड्डाणपुलावर पोहोचताच त्यांच्या कारचा पुढील टायर अचानक फुटला.

त्यामुळे गाडीवरील त्यांचा ताबा सुटला आणि कार जाऊन डिव्हायडरला जोरदार धडकली. या धडकेनंतर कारचे आणखी दोन टायर फुटले आणि कार रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला २०० फूट दूर जाऊन पडली. अपघात होताच आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्याला सुरूवात केली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच, गंभीर जखमी झालेल्या अक्षय यांना तत्काळ नागपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.अपघाताच्या वेळी महामार्गावर इतर कोणतेही वाहन नसल्याने मोठी जीवितहानी टळली.

विशेष म्हणजे, उड्डाणपुलावर असलेल्या भक्कम लोखंडी बॅरिकेड्समुळे गाडी पुलाखाली येण्यापासून बचावली. बॅरिकेड्स नसते तर मोठी दुर्घटना घडली असती, असे घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी सांगितले. अपघात होताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या अक्षयला नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. टायरच्या योग्य देखभालीसह वेगावर नियंत्रण ठेवणे आणि सुरक्षित अंतर राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे तज्ज्ञ सांगत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.