म्यानमारमध्ये विनाशकारी भुकंपाचे हादरे; आतापर्यंत २०५६ गतप्राण, ३ हजारांहून अधिक जखमी; बचावकार्याला वेग.

म्यानमारमध्ये झालेल्या भुकंपातील मृतांचा आकडा २ हजार ५६ वर पोहोचला आहे. तर ३ हजारांपेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.म्यानमारमध्ये झालेल्या भुकंपातील मृतांचा आकडा २ हजार ५६ वर पोहोचला आहे. तर ३ हजारांपेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत आणि सुमारे २७० लोक अजूनही बेपत्ता असल्याचे वृत्त समोर आले आहे. म्यानमारमधील सत्ताधारी जुंटा सरकारने सोमवारी अधिकृतपणे ही माहिती दिली आहे. भुकंप इतका भीषण होता की, सारंच उद्ध्वस्त झालं आहे.म्यानमारमध्ये ७.७ रिश्टर सेलच्या विनाशकारी भुकंपामुळे ढिगाऱ्याखाली लोक दबले गेले. त्यांचे बचावकार्य सध्या सुरु आहे. या प्रलयात मृत पावलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सध्या एक आठवड्यासाठी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तर अद्याप येथील नागरिक या हादऱ्यातून अद्याप सावरलेले नाहीत.अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंडाले येथील ग्रेट वॉल हॉटेलच्या ढिगाऱ्याखालून एका महिलेला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

तीन दिवसांनंतर कोणीतरी व्यक्ती जिवंत सापडल्याने लोक वाचण्याची आशा निर्माण झाली आहे. म्यानमारमधील चिनी दुतावासाने त्या महिलेची प्रकृती स्थित असल्याचे फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे.म्यानमारमधील भूकंपाच्या केंद्राजवळ असणाऱ्या मंडाले येथे हा विनाशकारी भूकंप झाला, ज्याचे धक्के थायलंडसह शेजारील इतर देशालाही बसले आहेत. परिणामी राजधानी बँकॉकसह अनेक भागात नुकसान झाले असल्याचे वृत्त आहे.बँकॉकमध्ये मध्ये निर्माणाधीन असणारी गगनचुंबी इमारत जमीनदोस्त झाली. यामध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ७६ लोकांना वाचवण्यासाठी बचाव पथकांनी शर्थीचे प्रयत्न केले.

भूकंपाच्या धक्क्यामुळे या इमारतीची रचना कोसळली. दुसरीकडे रविवारपर्यंत थायलंडमध्ये मृतांची संख्या १८ होती जी आणखी वाढण्याची भीती आहे.म्यानमारमधील अंतर्गत कलहामुळे देश आधीच संकटात होता. पण आता या विनाशकारी भूकंपामुळे देशातील स्थिती आणखी बिकट झाली आहे. भारतासह अनेक देशांनी आणि संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी या आपत्तीमुळे बाधित झालेल्या २३ हजारांहून अधिक लोकांना मदत करण्यासाठी मदत पाठवली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.