दोन चिमुकले खिडकीत बसलेले, अचानक ग्रील तुटून खाली कोसळलं आणि…; उल्हासनगरमध्ये थोडक्यात अनर्थ टळला.

दुसऱ्या मजल्यावरून ग्रील तुटून दोन मुलं खाली कोसळल्याची घटना घडली असून या घटनेत दोन्ही मुलं जखमी झाली आहे.उल्हासनगरमध्ये भयंकर घटना घडली असून यात घटनेत दोन चिमुकल्यांचा जीव थोडक्यात बचावला आहे. दोन मुलं खिडकीच्या ग्रीलमध्ये बसलेली होती. त्याचवेळी ग्रील तुटल्याने दोन लहान मुलं इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन्ही मुलं जखमी झाली आहेत. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.उल्हासनगरच्या कॅम्प ५ मध्ये ही घटना घडली. गांधी रोडवर हरे कृष्णा ही इमारत आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटच्या ग्रीलमध्ये दोन चिमुकले बसले होते. सात वर्षांचा मुलगा आणि चार वर्षांची मुलगी असे दोघे लहानगे ग्रीलमध्ये बसलेले होते. दोघं ग्रीलमध्ये बेसावध असताना अचानक खिडकीला लावलेलं ग्रील तुटून खाली कोसळलं.महत्त्वाची बाब म्हणजे ग्रील कोसळलं त्यावेळी ते इमारतीच्या कंपाउंडला लावण्यात आलेल्या पत्र्यांवर कोसळलं.

ग्रील पत्र्यांवर कोसळल्याने सुदैवाने यात मुलांचा जीव वाचला आहे. पण या घटनेत दोन्ही मुलं जखमी झाली आहेत. दोघांपैकी सात वर्षीय मुलाचे दात पडले असून त्याच्या डोक्यालाही इजा झाली आहे. तर चार वर्षीय मुलीलाही किरकोळ इजा झाली आहे. या दोघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीपासून काही मिनिटांवर आम्ही ऑफिसमध्ये बसलेलो. ऑफिसमध्ये बसलेलो असताना अचानक मोठा आवाज आला.

आम्ही तातडीने बाहेर आलो, तेव्हा समजलं की दोन मुलं ग्रील तुटल्याने खाली पडली, ग्रील पूर्णपणे सडल्याने खिडकीला लावलेलं ग्रील तुटून खाली पडलं. पण इमारतीखाली मोठी शेड असल्याने त्यात तुटलेलं ग्रील अडकलं आणि थोडक्यात मुलांचा जीव वाचला. ग्रील तुटून इमारतीखाली असलेल्या शेडवर पडलं. ग्रीड पडल्याने शेड तुटली. ग्रील ज्या ठिकाणी पडलं त्या शेडवर मोठं भगदाड पडलं आहे. मात्र महत्त्वाची बाब म्हणजे या शेडमुळे मुलांचा जीव वाचला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.