साखरपुडा झाला, घरात लग्नाची तयारी; २२ वर्षीय तरुणाचा डंपरच्या धडकेत मृत्यू, आई-वडिलांचा आक्रोश.

तळोदा येथील सर्फराज अश्फाक शेख याचा नुकताच साखरपुडा झाला होता. त्यामुळे त्याच्या घरात लग्नाची तयारी सुरू होती. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते.नुकताच साखरपुडा झाला, घरात लग्नाची तयारी सुरु होती, त्यातच रमजान ईद असल्याने मित्रांसोबत दर्शनासाठी निघालेल्या २२ वर्षीय तरुणाचा अपघातात मृत्यू झाला. फोन करण्यासाठी एके ठिकाणी थांबले असताना वाळू भरलेल्या भरधाव डंपरने धडक दिली. यामध्ये युवकाच्या जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवार ३१ मार्च रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास नंदुरबार जिल्ह्यातील नळगव्हाण फाट्याजवळ घडली. जिथे लग्नाची वरात निघायला हवी होती, तिथे अंत्ययात्रा निघाली. यावेळी आई-वडिलांचा आक्रोश, कुटुंबीयांचे अश्रू मन हेलावून टाकणारे होते.

घरी ईद साजरी केल्यानंतर तळोदा येथील सर्फराज अशपाक शेख (वय २२ वर्ष) हा जाकीर मन्सूरी (वय २२) आणि शामीन याकूब खाटिक (वय २४) या दोघा मित्रांसमवेत दर्ग्याच्या दर्शनासाठी दुचाकी (एम.एच ३९ क्यू ०८३३) ने दुपारी २ वाजेच्या सुमारास अक्कलकुवा येथे जात होता. त्यावेळी फोनवर बोलण्यासाठी तळोदा ते अक्कलकुवा दरम्यान असलेल्या नळगव्हाण फाट्याजवळ थांबले होते.त्याचवेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या दिली. अपघाताची तीव्रता एवढी होती की त्यात सर्फराज या तरुणाचा मांडीजवळील भाग अक्षरश पूर्णपणे चिरडला जाऊन त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या सोबत असलेले दोघे तरुण गंभीर जखमी झाले.घटनेची माहिती कळताच स्थानिकांनी धाव घेतली.

त्यांना तत्काळ तळोदा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. डॉ. संतोष ठाकरे यांनी त्यांच्यावर उपचार केला. सर्फराज यास मृत घोषित केले. तळोदा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृत सर्फराजचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू होती. मुस्लिम बांधवांनी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.तळोदा येथील सर्फराज अश्फाक शेख याचा नुकताच साखरपुडा झाला होता. त्यामुळे त्याच्या घरात लग्नाची तयारी सुरू होती. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. घरातील लोक लग्नाच्या तयारीत मग्न असताना अचानक त्याच्या मृत्यूची बातमी आली आणि संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. जिथे लग्नाची वरात निघायला हवी होती, तिथे अंत्ययात्रा निघाली. नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैधपणे वाळूची तस्करी करण्यात येते. या भरधाव वाहनांमुळे अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.