मालगाडीसमोर स्वतःला झोकून दिलं, रेल्वे स्थानकावरच टीसीने आयुष्य संपवलं, कारण हादरवणारं.

घरगुती कारणावरून पोलीस तक्रार झाली होती, मूर्तिजापूर शहर पोलीस अटक करायला गेले होते, पण ड्युटी सुरू असल्याने ड्युटी संपल्यावर अटक करणार होतेअकोल्यातील मुर्तिजापूर रेल्वे स्थानकावर एका तिकीट चेकर (टीसी) याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मूर्तिजापूर येथून भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या मालगाडी समोर येऊन टीसीने आयुष्याची अखेर केली. सुमेध मेश्राम अस आत्महत्या करणाऱ्या टीसीचे नाव आहे. घरगुती तणावातून सुमेधने आपली जीवनयात्रा संपविल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घरगुती कारणावरून पोलीस तक्रार झाली होती, मूर्तिजापूर शहर पोलीस अटक करायला गेले होते, पण ड्युटी सुरू असल्याने ड्युटी संपल्यावर अटक करणार होते, तेवढ्यात त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे.

अकोला जिल्ह्यात घरगुती कारणाने आत्महत्या झाल्याची ही दोन दिवसातील दुसरी घटना आहे. अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यात दोन दिवसांआधी एका घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. तलाठ्याच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच मुर्तीजापूर येथे तिकीट चेकरने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावरील कर्तव्यावर असलेले ४० वर्षीय सुमेध मेश्राम हे घरगुती कारणामुळे तणावात होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. फलाट क्रमांक एकवर कर्तव्य बजावत असताना सुमेध मेश्राम यांनी अचानक मूर्तिजापूरवरून भुसावळकडे जाणाऱ्या मालगाडीखाली उडी घेतली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. छिन्न विच्छिन्न मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. घरगुती कलहातून शासकीय नोकरदाराने आत्महत्या केल्याची दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे.शेतकरी आत्महत्यांप्रमाणे आता शासकीय कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या समोर यायला लागल्याने शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. घरगुती आणि कामाचा ताण आल्याने कदाचित अश्या घटना घडत असतील, तर शासनाने आता कर्मचाऱ्यांसाठी समुपदेशनाचे कक्ष निर्माण करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. ज्यामुळे तणावात असलेले कर्मचारी टोकाचं पाऊल उचलणार नाहीत आणि अश्या प्रकारच्या आत्महत्यांना आळा बसू शकेल.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.