भूमिगत मेट्रोच्या गाड्या धूळखात, नऊपैकी सहा गाड्या कारशेडमध्येच; अत्यल्प प्रवाशांमुळे मर्यादित वापर

भूमिगत मेट्रोच्या गाड्यांचा अत्यल्प प्रवाशांमुळे मर्यादित वापर होत असून या भूमिगत मेट्रोच्या गाड्या धूळखात उभ्या असल्याचं चित्र आहे. ९ पैकी ६ गाड्या कारशेडमध्येच असल्याचं दिसतं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थाटामाटात सुरू झालेल्या बहुचर्चित भूमिगत मेट्रोच्या गाड्या आरे कारशेडमध्ये धूळखात उभ्या असल्याचे चित्र आहे. अत्यल्प प्रवासी संख्येमुळे मयादित गाड्यांचाच वापर होत असल्याने उर्वरित गाडया तशाच उभ्या आहेत. मेट्रो ३ ही देशातील १०० टक्के व राज्यातील सर्वाधिक लांबीची मेट्रो मार्गिका आहे. मार्गिकेचा पहिला टप्पा आरे जेव्हीएलआर ते वांद्रे कुर्ला संकूल (बीकेसी) असा दहा स्थानकांचा आणि १२.९९ किमी लांबीचा आहे. त्याचेच उद्‌द्घाटन पंतप्रधानांनी ५ ऑक्टोबर २०२४ ला केले होते. या टप्प्यात सीप्झ, एमआयडीसी, विमानतळाचे दोन्ही टर्मिनल यांचा समावेश आहे. तसे असतानाही मार्गिकेवर प्रवासी संख्या अपेक्षेपेक्षा नाममात्र आहे.मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यात दररोज दोन लाख प्रवाशांची ये-जा असेल, अशी अपेक्षा होती.

प्रत्यक्षात सध्या मार्गिकेवरील दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या जेमतेम २० हजारांच्या घरात आहे. त्यामुळेच सर्व गाड्यांचा वापर होत नसल्याची स्थिती आहे. पहिल्या टप्प्यासाठी मागवण्यात आलेल्या एकूण नऊ गाड्यांपैकी अवघ्या तीन गाड्या वापरात आहेत. त्यातही दोनच गाड्या दररोज प्रत्यक्ष सेवेत आहेत. तिसरी गाडी’ स्टँडबाय’ असते. मात्र परिणामी सहा गाड्या आरे येथील कारशेडमध्ये तशाच धूळखात उभ्या असल्याचे आरे जेव्हीएलआर स्थानकावार गेल्यानंतर स्पष्ट दिसून येत आहे.ही मार्गिका केंद्र आणि राज्य सरकारच्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसी) या संयुक्त कंपनीकडून चालवली जाते.

नेमक्या किती गाड्या दररोज चालवल्या जातात, याबाबत विचारले असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाहीही मार्गिका दोन टप्प्यांत सुरू होणार आहे. त्यालील दुसरा टप्पा धारावी ते आचार्य अत्रे चौक असा असेल. तर, अखेरचा टप्पा तिथून कफ परेडपर्यंत असेल. या तिन्ही टप्प्यांसाठी मिळून एमएमआरसीने प्रत्येकी आठ डब्ब्यांच्या ४२ गाड्यांची ऑर्डर फ्रान्सच्या अलस्टॉम कंपनीला दिली होती. त्यापैकी २३ हजार २०० कोटी रुपये खर्च केले जात आहेत. त्यानुसार एक गाडी सरासरी ५५२ कोटी रुपयांची आहे. त्यातील नऊ गाड्या पहिल्या टप्प्यासाठी मुंबईत दाखल असून त्यातील ३३१४ कोटी रुपयांच्या सहा गाड्या वापराविना कारशेडमध्येच आहेत.या मार्गिकचा एकूण खर्च ३० हजार कोटी रुपये आहे. त्यातील पहिला टप्पा १४ हजार १२० कोटी रुपयाचा आहे. त्यात गाड्यांचा खर्च ५ हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.