नागरिक त्रस्त, चोपडा नगरपालिका प्रशासन सुस्त!

नागरिक त्रस्त, चोपडा नगरपालिका प्रशासन सुस्त!

साने गुरुजी नगर भागात ओपन स्पेस मध्ये अनाधिकृत बांधकामाचा धडाका

जिल्हा प्रतिनिधी समाधान कोळी

चोपडा – शहरातील साने गुरुजी नगर भागात असलेल्या नगरपालिकेच्या मालकीच्या ओपन स्पेस (खुल्या जागेत) लगतच्या काही रहिवास्यांनी अनाधिकृत अतिक्रमण केलेले आहे. सदर अतिक्रमण हटवून ओपन स्पेस मध्ये सजावटीकरण, वृक्ष लागवड इत्यादी होणे करिता कॉलनीच्या उर्वरित रहिवाशांनी सुमारे सहा ते सात महिन्यांपासून नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे अर्ज केलेला आहे. अर्जाचा रहिवाशांकडून सतत पाठपुरावा केला जात असून सुद्धा अतिक्रमण हटविण्याकरिता नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे. याबाबतीत नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना तसेच अनाधिकृत बांधकाम करणाऱ्या रहिवास्यांना आळा घालण्याकरिता उर्वरित रहिवासांच्या वतीने मा. न्यायालयाच्या मार्फत नगरपालिका प्रशासन कार्यवाहीत वेग आणण्याकरिता नोटीस देखील बजावण्यात आलेली आहे, तरी सदर कार्यवाही होत नसल्याचे लक्षात घेता काही रहिवाशांनी ओपन स्पेस मध्ये अनाधिकृत अतिक्रमित बांधकाम करण्याचे सत्र सुरू ठेवलेले आहे. नगरपालिकेचे नियमित कर दाते असलेले सुजाण रहिवासी नगरपालिकेच्या दुर्लक्षित कारभारामुळे नाराजी व्यक्त करत आहेत. सदर भागातील बहुसंख्य रहिवासी या समस्याने त्रस्त असून नगरपालिकेच्या मंद कार्यवाही बाबत साने गुरुजी नगर भागातून निषेध व्यक्त केला जात आहे. सदर कार्यवाहीला वेग प्राप्त न झाल्यास तीव्र आंदोलनाचा मार्ग पुकारण्यात येईल असे नागरिकांना सुचविले.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.