‘मुंबईत आल्यावर शिवसेना स्टाईलने स्वागत करु’, राहुल कनाल यांचा धमकीवजा इशारा?

“मुंबईत आपल्याला धोका आहे असं सांगणं फक्त निमित्त आहे. त्यांना तिथल्या लोकांकडून संरक्षण मिळत आहे. त्यांना कोणत्या गोष्टी तिथे उपलब्ध होतात ज्यामुळे ते मुंबईत न राहता तिकडे राहतात. त्यांना कोणतंही संरक्षण मिळूद्या. ते जेव्हा कधी मुंबईत येणार त्यांचं शिवसेना स्टाईल एकदम स्वागत होणार”, असा इशारा राहुल कनाल यांनी दिला.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त गाणं तयार करुन वादात सापडलेला कॉमेडियन कुणाल कामरा हा मुंबईत येईल तेव्हा त्याचं शिवसेना स्टाईलने स्वागत करु, असं वक्तव्य शिंदेंच्या युवासेनेचे सचिव राहुल कनाल यांनी केलं आहे. कुणाल कामरा हा 31 मार्चला पोलीस चौकशीला सामोरं जाणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यासाठी त्याने मुंबईत येणं अपेक्षित आहे. विशेष म्हणजे मुंबई पोलीस हे कुणाल कामराच्या घरीदेखील दाखल झाले आहेत. पण कामरा अद्याप मुंबईत आलेला आहे का? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. या दरम्यान कुणाल कामरा मुंबईत येईल तेव्हा त्याचं शिवसेना स्टाईलने स्वागत करु, असा धमकीवजा इशाराच राहुल कनाल यांनी दिला आहे. ते ‘एएनआय’ वृतसंस्थेशी बोलत होते.

“आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आलो होतो. इथे आम्ही पोलीस ठाण्यात सोमवारी आणि गुरुवारी हजेरीसाठी येतो. ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. आमच्या पूर्ण युवासेनाचा ग्रुप इथे येतो आणि हजेरी देतो. कुणाल कामराला मद्रास कोर्टाने 7 एप्रिलपर्यंत दिलासा दिला आहे. मी कोर्टाच्या निर्णयाचा आदर करतो. त्यांना 7 मार्चपर्यंत दिलासा मिळाला आहे. पण त्यानंतर त्यांना कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जावं लागेल. मुंबईत त्यांचं शिवसेना स्टाईलने स्वागत होईल”, असं राहुल कनाल म्हणाले.”मुंबईत आपल्याला धोका आहे असं सांगणं फक्त निमित्त आहे. त्यांना तिथल्या लोकांकडून संरक्षण मिळत आहे. त्यांना कोणत्या गोष्टी तिथे उपलब्ध होतात ज्यामुळे ते मुंबईत न राहता तिकडे राहतात. त्यांना कोणतंही संरक्षण मिळूद्या. ते जेव्हा कधी मुंबईत येणार त्यांचं शिवसेना स्टाईल एकदम स्वागत होणार”, असा पुनरुच्चार राहुल कनाल यांनी केला.”धमकी नाही. आता सर्व तुम्हाला सांगून अर्थ नाही. मुंबईचा नेहमी एक फॅब्रिक राहिलेला आहे. अथिती देवो भव: असं मुंबईत मानलं जातं. कुणाल स्वत:ला आज मुंबईचा अतिथी मानत आहेत. इतक्या वर्षांपासून मुंबई त्यांची कर्मभूमी होती. त्यांनी इथे पैसे कमावले. इथे दादर-माहीममध्ये त्यांनी कॉमेडीला सुरुवात केली. यानंतर आता ते अचानक मद्रासचे रहिवासी आहेत. त्यांना विचारा की, कोविडची लस मद्रासला की मुंबईला घेतली होती?”, असा सवाल राहुल कनाल यांनी केला. “हे लोक दलबदलू, कलरबदलू लोक आहेत. त्यांचे नेता संजय राऊत हे सर्वात मोठे दलबदलू आहेत. ठिक आहे. योग्य वेळी आम्ही उत्तर देऊ”, असं देखील राहुल कनाल म्हणाले.”आम्ही भारताचे नागरीक आहोत. आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाला मानणारी माणसं आहोत. आम्ही कोर्टात गेलो. आम्ही बेल घेतली. आज आम्ही इथे हजेरीत आलो. तर दुसऱ्याकडचे लोक दिलासाचं बोलत आहेत. पण तुमचं म्हणणं जे आहे ते तपास यंत्रणांसमोर ठेवा. त्यात घाबरण्यासारखं काय आहे?”, असा सवालदेखील राहुल कनाल यांनी केला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.