सर्वांची काळजी घे! विद्यार्थ्याचा आईला मेसेज; पाचव्या मजल्यावरुन उडी, वाढदिवशीच जीवनाची अखेर.

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये ट्रिपल आयटीमध्ये बीटेकच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या मुलानं आत्महत्या केली आहे. पाचव्या मजल्यावरुन उडी मारत राहुल चैतन्य मडला नावाच्या तरुणानं जीव दिला. तो मुलांच्या वसतिगृहात वास्तव्यास होता.लखनऊ: उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये ट्रिपल आयटीमध्ये बीटेकच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या मुलानं आत्महत्या केली आहे. पाचव्या मजल्यावरुन उडी मारत राहुल चैतन्य मडला नावाच्या तरुणानं जीव दिला. तो मुलांच्या वसतिगृहात वास्तव्यास होता. ३० मार्चला म्हणजेच स्वत:च्या वाढदिवशीच त्यानं जीवनप्रवास संपवला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यानं आईला एक मेसेज केला होता. भावाची, कुटुंबाची काळजी घे, अभ्यासामुळे थोडा त्रासलोय, असं राहुलनं त्याच्या आईला पाठवलेल्या मेसेजमध्ये लिहिलं होतं.


राहुलनं पाचव्या मजल्यावरुन उडी घेत आयुष्य संपवलं. रात्री १२ च्या सुमारास घडलेल्या घटनेनं शिवपुरी वसतिगृहात खळबळ माजली. महाविद्यालय प्रशासनानं राहुलला रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. राहुल मंडला बीटेकच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी होता. तो तेलंगणातील निजामाबादचा रहिवासी होता. तो मूकबधीर होता.पहिल्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच सेमिस्टरमध्ये राहुल अनुत्तीर्ण झाला. त्यामुळे त्यानं आत्महत्या केली असावी, अशी चर्चा महाविद्यालय आणि वसतिगृहात आहे. पहिल्याच सेमिस्टरमध्ये नापास झाल्यानं तो तणावाखाली होता. त्याचाच उल्लेख त्यानं आईला केलेल्या मेसेजमध्ये केला. ‘अभ्यासाचा ताण आहे. त्यामुळे आयुष्य संपवतोय,’ असं राहुलनं आईला केलेल्या मेसेजमध्ये लिहिलं होतं.राहुलचा मेसेज वाचून आईनं महाविद्यालयात फोन केला. राहुल ऐकू, बोलू शकत नव्हता. त्यामुळे तो कायम व्हिडीओ कॉल करुन खाणाखुणांनी संवाद साधायचा, असं राहुलच्या आईनं सांगितलं. ‘महाविद्यालयात प्रवेश घेताना तो ५२ व्या क्रमांकावर होता. त्यामुळेच त्यानं प्रवेश घेतला होता,’ अशी माहिती राहुलच्या आईनं दिली.राहुलच्या आत्महत्येनं त्याच्या कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. राहुलची आई शवविच्छेदन केंद्राबाहेर बसून लेकाची आठवण काढून धाय मोकलून रडली. राहुलनं वाढदिवशीच आत्महत्या केली. दुसरीकडे राहुलच्या आत्महत्येनं नाराज झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढला. विद्यार्थ्यांना होणाऱ्या मानसिक त्रासामुळे तणाव वाढला आहे. याबद्दल महाविद्यालय प्रशासनानं पाऊल उचवावं, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. या घटनेनं विद्यार्थ्यांवरील वाढत्या मानसिक ताणाचा विषय ऐरणीवर आला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.