माझ्या ९ वर्षांच्या लेकीवर अत्याचार, आईचा मला फोन; चित्रा वाघ यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग.

मी ते बघत असताना माझा मुलगा म्हणाला, अगं तू हे काय बघतेयस, खूप घाण बाई आहे ही, मी म्हटलं कोण आहे? तेव्हा त्याने मला सांगितलं, की उर्फी जावेद नावाची कोणीतरी मॉडेल आहे.भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी मॉडेल उर्फी जावेद (Uorfi Javed) हिच्या कपड्यांवर आक्षेप घेत काही काळापूर्वी हे प्रकरण उचलून धरलं होतं. मात्र हा मुद्दा आपण नेमका का लावून धरला, यामागील किस्सा चित्रा वाघ यांनी सांगितला आहे. एका महिलेचा येणारा फोन आणि तिची सुन्न करणारी कहाणी यामागे असल्याचं पाहायला मिळालं. प्रख्यात अभिनेत्री-लेखिका मुग्धा गोडबोले रानडे यांच्या ‘आरपार ऑनलाईन’ला दिलेल्या मुलाखतीत चित्रा वाघ बोलत होत्या. मुलाखतीच्या प्रोमोत त्यांनी हा किस्सा सांगितल्याचे पाहायला मिळते.

एक बाई मला सारखी मेसेज करायची.. मला बोलायचंय, मला भेटायचंय.. मी म्हटलं कोण आहे, तर तिने मला एका क्लीप पाठवली. ती क्लीप अशी होती की, एक मुलगी होती, ती अर्ध्या कपड्यांमध्ये होती, रस्त्यावरुन चालत होती आणि तिच्यामागे मुलं चेकाळत चालली होती. मी ते बघत होते आणि मम्मी इतक्या रात्री आली म्हणून माझा मुलगा आला बघायला, असं चित्रा वाघ सांगत होत्या.मी ते बघत असताना माझा मुलगा म्हणाला, अगं तू हे काय बघतेयस, खूप घाण बाई आहे ही, मी म्हटलं कोण आहे? तेव्हा त्याने मला सांगितलं, की उर्फी जावेद नावाची कोणीतरी मॉडेल आहे. मी पाहिलं सगळे विचित्र कपडे.. ती अर्धनग्न अवस्थेतच होती, असं चित्रा वाघ सांगत होत्या.मग मी त्या बाईला फोन केला, ती म्हणाली, मी तुम्हाला यासाठी पाठवलं, की मला तुमच्याकडून शासकीय मदत नकोय, पण माझ्या नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झालाय, आम्ही त्या ट्रॉमामधून अजून बाहेर नाही आलोय, मी फक्त तुम्हाला हे सांगते, की तुम्ही हे थांबवा. कारण अशा या उघड्या नागड्या बायका मुंबईच्या रस्त्यावर फिरतायत, हिला सांभाळायला चार बाऊन्सर आहेत, माझ्या मुलीचा काय दोष होता, तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, अशी महिलेची आपबिती चित्रा वाघ यांनी सांगितली.मी एक आई म्हणून, तिचे बाबा हे एक वडील म्हणून यातून बाहेरच नाही आलोय, हा नंगानाच तुम्ही कधी थांबवणार आहात? हे जसेच्या तसे तिचे शब्द आहेत. मग मी तो उर्फी जावेदचा विषय घेतला, अशी माहिती चित्रा वाघ यांनी दिली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.