छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा आणि विजापूर सीमावरती भागातील एकेली आणि बेलणार परिसरात आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा आणि विजापूर सीमावरती भागातील एकेली आणि बेलणार परिसरात आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत 25 लाख इनाम असलेल्या रेणुका उर्फ बानूचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. छत्तीसगड पोलिसांचे डीआरजी पथक आज सकाळी नक्षलविरोधी अभियानावर होते. यावेळी नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत रेणुकाचा खात्मा केला आहे.










