संतोष देशमुखांचे अनैतिक संबंध दाखवण्यासाठी तयार केलेल्या महिलेचा घरातच सापडला मृतदेह, दमानियांना हत्येचा संशय.

 बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. संतोष देशमुख यांना मारहाण केल्यावर ज्या महिलेच्या घरी नेण्यात येणार होतं, त्या महिलेची मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात ज्या महिलेच्या घरी त्यांना नेण्यात येणार होतं त्याच महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेचा मृतदेह घरात पडून असल्याने वास सुटला होता. त्यानंतर घराचे दार तोडून मृतदेह बाहेर काढला गेला. मात्रा आता संबंधित महिलेचा मृत्यू कसा झाला? तिची हत्या झाली का? हत्येमागे कोण? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत महिलेबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. महिला एकावेळी पाच नावांचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे.

गूढ संपता संपत नाही आणि हत्या संपता संपत नाहीत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची कळंब शहरात हत्या? संतोष देशमुखांवर अनैतिक आरोप करण्यासाठी तयार आसलेली कळंब शहरातील द्वारका नगर मधे राहत आसलेल्या महिलेची हत्या झाल्याचे कळतंय. या महिलेची ७ ते ८ दिवसांपुर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. कुठल्या कारणाने हत्या झाली अन बीड पोलीसांना ही बातमी कळाली अन ते घटना स्थळी पोहचल्यावर नंतरच तेथील रहिवासी आणि स्थानिक पोलीसाना कळाली व अजून याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली की अनैतिक संबंधातून हत्या झाली अशी चर्चा सध्या सुरू आहे.या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करीत आहेत. असं असलं तरी शहर आणि परिसरात या घटनेने दहशत पसरली आहे.शहरातील द्वारका नगरीत राहणाऱ्या लोकांना २ दिवसांपासून उग्र वास येत होता. पणन ज्या घरातून वास येत होता त्या घराला बाहेरून कुलूप लावलेले होते. दरवाजा तोडून बीड पोलीस आणि स्थानिक पोलीसानी आत प्रवेश केल्यानंतर संबंधित महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना आढळला. व मृतदेह सडलेला आसल्यामुळे जागेवरच मृतदेहाचे पोष्टमार्टम केले आणि अंत्यविधी ही उरकला या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत .ही महिला अनेक पुरुषांना अडकवण्याचे काम करायची आणि त्यासाठी ती खाली दिलेल्या नावांचा वापर करायची १)मनीषा आकुसकर, आडस ,२)मनीषा बिडवे, कळंब,३)मनीषा मनोज बियाणी, कळंब
४)मनीषा राम उपाडे, अंबाजोगाई,५)मनीषा संजय गोंदवले, रत्नागिरी.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.