हिमाचलमध्ये निसर्गाचे रौद्ररुप; मणिकर्णमध्ये भुस्खलन, अनेकजण जखमी.

हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात भूस्खलनाची मोठी दुर्घटना घडली आहे. मणिकरण येथील गुरुद्वाराजवळ रविवारी सायंकाळी ही घटना घडली असून यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर डझनभर लोक जखमी झाले आहेत.हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात भूस्खलनाची मोठी दुर्घटना घडली आहे. मणिकरण येथील गुरुद्वाराजवळ रविवारी सायंकाळी ही घटना घडली असून यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर डझनभर लोक जखमी झाले आहेत. वृत्तानुसार, गुरुद्वाराजवळील एक झाड पडले आणि त्याखाली येऊन जखमी झालेल्या लोकांचा मृत्यू झाला आहे. जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा तेथील लोक रस्त्याच्या कडेला झाडाखाली बसले होते आणि इतक्यात त्यांच्यासमोर काळ उभा ठाकला.अचानकपणे भूस्खलन झाले असता डोंगरावरील संपूर्ण ढिगारा झाडावर येऊन आदळला. यामध्ये एका झटक्यात झाड मुळापासून उखडून कोसळले.

तेथे बसलेले लोक त्याखाली दबले गेले. अधिकृत माहितीनुसार, रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका फेरीवाल्याचा मृत्यू झाला आहे. तर सुमो कारमध्ये प्रवास करणाऱ्या दोन लोकांना देखील प्राण गमवावा लागला आहे.तर तीन पर्यटकांचा देखील मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सहा जणांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तर त्यांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरु आहे.कुल्लूचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी (एडीएम) अश्विन कुमार म्हणाले की, या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे. प्रशासन आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून परिस्थिती हाताळत आहेत.

डोंगरावरून दरड कोसळल्याने परिणामी कुल्लू ते मणिकरणला जोडणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी, पोलिसांनी मणिकर्णच्या आधी वाहतूक थांबवली आहे.मणिकर्णसारख्या वर्दळीच्या आणि धार्मिक स्थळी ही दुर्घटना घडल्याने स्थानिकांमध्ये आणि पर्यटकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने लोकांना सतर्क राहण्याचे आणि घटनास्थळापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. अपघातामागे नेमके कोणते कारण याचा शोध घेतला जात आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.