गर्ल मोनालिसाला सिनेमाची ऑफर देणाऱ्या दिग्दर्शकाला अटक, दिल्ली पोलिसांची कारवाई, नेमकं प्रकरण काय.

प्रयागराज महाकुंभ मेळ्यात व्हायरल झालेल्या व्हायरल गर्ल मोनालिसाला चित्रपटाचा ऑफर देणाऱ्या दिग्दर्शकाला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. न्यायालयाने त्याचा जामिन अर्ज फेटाळला आहे.प्रयागराज महाकुंभ मेळ्यात व्हायरल झालेल्या मोनालिसाला चित्रपटाचा ऑफर देणारे दिग्दर्शक सनोज मिश्रांना बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. दिल्ली ही कारवाई केली आहे. दिल्ली उच्च न्यायलयाद्वा मिश्रांची जामिन याचिका फेटाळण्यत आल्यानंतर ही कारवाई केली गेली. सनोज यांच्यावर आरोप आहे की त्यांनी झाशीतील एक तरुणीला चित्रपटात काम देण्याची ऑफर देत तिचे लैंगिक शोषण केले आणि तिला धमकी देत शांत राहायला सांगितले होते. सनोजने मोनालिसाला ‘द मणिपुर डायरी’मध्ये भूमिका ऑफर केली होती.पीडित महिलेने आरोप केले आहेत की, तिची सनोज मिश्राशी २०२० मध्ये टिकटॉक इन्स्टाग्रामच्याद्वारे ओळख झाली.

त्यावेळी ती राहत होती. काही काळ चॅटिंग आणि बोलणे झाल्यानंतर १७ जून २०२१ मध्ये सनोजने तिला फोन करुन सांगितले की, ते झाशी रेल्वे स्थानकाच्या येथे पोहचले आहे.सामाजिक दबावामुळे तिने मिश्राला भेटण्यास नकार दिला. मात्र मिश्राने आत्महत्या करण्याची धमकी दिली. भितीमुळे ती त्याला भेटण्यास गेली.१८ जून २०२१ मध्ये मिश्राने पुन्हा एकदा आत्महत्या करण्याची धमकी देत तिला रेल्वे स्थानकावर बोलवले. तेथून एका रिसॉर्टवर घेऊन गेला. तिथे नशेचा पदार्थ देत तिच्यासोबत चुकीचे कृत्य केले.पीडितेने आपल्या एफआयआरमध्ये नमूद केले आहे की, मिश्राने तिचे आक्षेपार्ह फोटो काढले तसेच व्हिडिओ बनवले आणि तिला धमकी दिली जर तिने विरोध केला तर हे सर्व सार्वजनिक केले जाईल. यानंतर लग्नाचा बहाणा देत मिश्राने वेगवेगळ्या ठिकाणी बोलवून तिच्यासोबत शारीरिक संबंध बनवले आणि चित्रपटात काम करण्याचे आमिष दिले. चित्रपटात काम करण्याच्या आशेवरच ती मिश्रासोबत मुंबईत आली आणि राहू लागली.

तिथेही तिचे लैंगिक शोषण केले गेले तसेच अनेकदा मारहाणही केली गेली.पीडितेचा आरोप होता की सनोजने तीनवेळा तिचा जबरदस्तीने गर्भपात केला. फेब्रुवारी २०२५ मध्ये मिश्राने तिला सोडले आणि धमकी दिली जर तिने तक्रार केली तर तिची आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केली जातील. दिल्ली पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून मिश्रावर गु्न्हा दाखल केला. तपासानंतर त्याला अटक केली. सनोजने जामिनासाठी दिल्ली न्यायालयात धाव घेतली होती. मात्र कोर्टाने त्याची याचिका फेटाळली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.