दुसऱ्या मजल्यावर गेली अन्… आई घरात कामात व्यस्त, माजी मंत्र्यांच्या लेकीने आयुष्य संपवलं.

आसामचे दिवंगत माजी गृहमंत्री भृगु कुमार फुकन यांच्या एकुलत्या एक लेकीने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. तिने घरच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेत आपलं आयुष्य संपवलं आहे.आसामचे माजी गृहमंत्री भृगु कुमार फुकन यांच्या एकुलत्या एक मुलीचं निधन झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी मंत्र्‍यांच्या मुलीने आपलं आयुष्य संपवलं आहे. या तरुणीचं नाव उपासना फुकन असून ती २८ वर्षांची होती. उपासनाने २० मार्चला तिच्या येथील खारघुली परिसरातील राहत्या घरात आपली जीवनयात्रा संपवली. तिने घराच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेतली. ज्यात तिचा मृत्यू झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपासना आपल्या आईसोबत राहत होती. उपासना दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेतल्यानंतर तिला जखमी अवस्थेत तात्काळ गुवाहाटी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं.

याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सध्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. प्राथमिक तपासानुसार, उपासना गेल्या अनेक काळापासून मानसिक आजाराने ग्रस्त होती. ती यासाठी उपचारही घेत होती.याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, उपासनाने यापूर्वही आपला जीव देण्याचा प्रयत्न केला आहे. रविवारी जेव्हा तिची आई घरच्या कामांमध्ये व्यस्त होती, तेव्हा ती दुसऱ्या मजल्यावर गेली आणि तिने उडी घेतल्याचं सांगितलं जात आहे. घरात कुठलीही सुसाइड नोट सापडलेली नाही. माजी गृहमंत्री भृगु कुमार फुकन यांचं २००६ मध्ये निधन झालं होतं.

ते १९८५ मध्ये पहिल्यांदा आसाम गण परिषद (AGP) सरकारमध्ये गृहमंत्री होते. ते आसाम करारावर स्वाक्षरी करणाऱ्यांपैकी एक होते.सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत आसामचे कृषी मंत्री आणि AGP अध्यक्ष अतुल बोरा म्हणाले, ‘ऐतिहासिक आसाम चळवळीचे प्रमुख नेते, AGP चे ज्येष्ठ नेते आणि आसामचे माजी गृहमंत्री दिवंगत भृगु कुमार फुकन यांच्या कन्या उपासना फुकन यांच्या अकाली आणि दुर्दैवी निधनाने मला खूप दुःख झाले आहे.त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, ‘या दु:खाच्या प्रसंगी मी शोकाकुल कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो आणि देवाकडे मृत आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना करतो. ओम शांती.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.