थेट सांगली जेलच्या स्वच्छतागृहातून चक्क गांजाचा धूर; तीन आरोपींनी चिलिम बनवून गांजा ओढला.

अर्धवट जळालेला गांजा कारागृहातील पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी तिघांवर आता सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सांगली जिल्हा कारागृहातील स्वच्छतागृहात गांजा ओढताना तिघे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तिघांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सचिन बाबासाहेब चव्हाण, किरण लखन रणदिवे आणि सम्मेद संजय सावळवाडे अशी तीन न्यायालयीन बंदींची नावे आहेत. याप्रकरणी कारागृहातील सुभेदार सूर्यकांत पाटील यांनी फिर्याद दिली.संशयित सचिन चव्हाण, किरण रणदिवे, सम्मेद सावळवाडे हे तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. सध्या ते न्यायालयीन बंदी असून सांगली जिल्हा कारागृहात तिघांची ओळख झाली आहे.

दि. 29 रोजी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास बरॅक क्रमांक तीनच्या स्वच्छतागृहात तिघेजण औषध गोळ्यांचे रिकामे पाकिट गोल गुंडाळून त्यात गांजा भरून चिलिमसारखे तयार करून ते ओढत होते.  सुभेदार सूर्यकांत पाटील व हवालदार बबन पवार, शिपाई हणमंत पाटणकर हे बॅरेक क्रमांक 3 मध्ये राऊंड घेत होते.त्यावेळी तिघेही स्वच्छतागृहात गांजा ओढताना दिसून आले. त्यामुळे तिघांना ताब्यात घेतले. तेव्हा सचिन याच्याकडे औषध गोळ्याच्या रिकाम्या पाकिटाला गोल गुंडाळून त्याची चिलिम बनवून गांजा ओढल्याचे दिसून आले.

अर्धवट जळालेला गांजा कारागृहातील पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी तिघांवर आता सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, सचिन चव्हाणला तीन साथीदारांसमवेत गांजा तस्करीप्रकरणी अटक करून 20 लाखाचा गांजा जप्त केला होता. किरण रणदिवे हा बांधकाम व्यवसायिक माणिक पाटील यांच्या खुनातील संशयित आहे. सम्मेद सावळवाडे हा सुद्धा खुनातील संशयित आहे. त्याने दोघांच्या सहाय्याने तरुणाचे अपहरण करून खून केल्याचा गुन्हा दाखल आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.