तुझा-माझा काहीही संबंध नाही… गर्लफ्रेण्डच्या मेसेजने दुखावलेल्या १९ वर्षीय विद्यार्थ्याने नको तेच केलं.

प्रेयसीचा मेसेज असह्य झाल्यानंतर प्रियकराने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.प्रेमप्रकरणातून तरुणाने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे. आजपासून तुझा – माझा काहीही संबंध नाही, असा मेसेज प्रेयसीने पाठवला. प्रेयसीचा असा मेसेज सहन न झाल्याने तरुणाने आपलं आयुष्य संपवलं. १९ वर्षीय तरुण आयटीआयमध्ये शिक्षण घेत होता. पण त्याने उचललेल्या अशा टोकाच्या पावलाने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.१९ वर्षीय हिमांशू पांडेय नावाचा तरुण आयटीआयमध्ये फिटर ट्रेडमध्ये शिक्षण घेत होता. तो शेवटच्या वर्षाला होता. त्याने अचानक आयुष्य संपवल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. हिमांशू एका मुलीच्या प्रेमात होता. त्या मुलीने त्याच्या व्हॉट्सअॅपवर एक मेसेज पाठवला. आजपासून तुझा-माझा काहीही संबंध नाही, आजपासून आपले मार्ग वेगळे-वेगळे… असा मेसेज त्याच्या प्रेयसीने केला. तिचा अशा प्रकारचा मेसेज त्याला सहन झाला नाही आणि त्याने आपलं आयुष्य संपवलं.मृत हिमांशूच्या मोठ्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, हिमांशी काही दिवसांपासून तणावात होता.

पण त्याने त्याची समस्या कोणाशीही बोलून दाखवली नव्हती. हिमांशू त्याच्याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणीच्या प्रेमात होता.हिमांशू त्याच्या खोलीत एकटाच होता. संध्याकाळी हिमांशूची आई त्याच्या खोलीत गेली त्यावेळी तिथे हिमांशू फासावर लटकलेल्या अवस्थेत दिसला. समोरील दृष्य पाहून त्याच्या आईने एकच टाहो फोडला. हिमांशूच्या जाण्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. लेकाला अशा अवस्थेत पाहून आईचा टोहा काळीज पिळवटून टाकणारा होता.घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल होत पुढील तपास सुरू केला आहे.

पोलीस आता याप्रकरणी तरुणीच्या मेसेजनंतर तरुणाने आत्महत्या केली हे प्रकरण आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या श्रेणीमध्ये येतं का? या बाजूनेही तपास करत आहेत. तसंच पोलीस याप्रकरणी तरुणीची चौकशी करणार असून ही आत्महत्या प्रेयसीच्या मेसेजनंतरच करण्यात आली का? अशा विविध मुद्द्यांवरुन सखोल चौकशी केली जाणार आहे.हिमांशूच्या भावाने अनमोलने दिलेल्या माहितीनुसार, हिमांशू अतिशय आनंदी असायचा, पण मागील काही दिवसांपासून तो अतिशय त्रस्त दिसत होता. वडिलांचं २०२४ मध्ये निधन झालं होतं. यामुळे त्यांचं कुटुंब आधीच दु:खात होतं, आता हिमांशूच्या अशा आत्महत्येनंतर संपूर्ण कुटुंबावर पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.